Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवारांवर उखडले; म्हणाले 'मी बोलतो तेच...'

Sudhir Mungantiwar : लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
Chhagan Bhujbal, Sudhir Mungantiwar
Chhagan Bhujbal, Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीची आचासंहिता पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आले असले तरी अंतिम होताना दिसत नाही. काही जागांचा दोन्ही गटांतील तीनही पक्षांनी दावा ठोकल्याने तिढा वाढला आहे. यातच महायुतीचे जागावाटपाचे दोन फॉर्म्युला व्हायरल होत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.

लोकसभेसाठी महायुतीत भाजपला सर्वाधिक म्हणजे 30 हून अधिक जागा मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांतून महायुतीत जागावाटपाचे दोन फॉर्म्युला तयार असल्याची माहिती समोर येत आहे. यात भाजपला 34 किंवा 37, शिवसेनेच्या शिंदे गटाला 8 किंवा 10 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 3 किंवा 4 जागा दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या फॉर्म्युल्यांबाबत महायुतीत कोणत्याही पक्षाने शिक्कामोर्तब केलेले नसून ते शिंदे गट आणि अजित पवार गटाने फेटाळले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal, Sudhir Mungantiwar
Chhagan Bhujbal News : जागावाटपावरून छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'आमची ताकदही शिंदे गटा...'

यावर छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला, एकनाथ शिंदे गटाएवढ्याच जागा द्यायला हव्यात. राज्यभरात आमचीही ताकद आहे, असे ठासून सांगितले. तसेच महायुतीतील घटक पक्षांतील प्रमुख नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही भुजबळांनी स्पष्ट केले आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी, भुजबळांची मागणी वैयक्तिक असल्याचे म्हणत त्यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

Chhagan Bhujbal, Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis News : रामदास कदमांचे गंभीर आरोप फडणवीसांनी अगदीच हलक्यात घेतले

मुनगंटीवार म्हणाले, भुजबळांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जितक्या जागा मिळतील तेवढ्याच अजित पवार गटाला देण्याची मागणी केली आहे. मात्र, ही त्यांची व्यक्तिगत मागणी आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत त्यांच्या पक्षातील अजित पवार, प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यापैकी जे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी बोलतील त्यानुसारच जागावाटप होईल. मुनगंटीवारांच्या विधानाला भुजबळांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

भुजबळांची मागणी वैयक्तिक असल्याचे म्हटल्यानंतर भुजबळ मुनगंटीवारांवर भडकले. भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत माझे जे मत आहे तेच आमच्या पक्षाचेही आहे. मी केलेली मागणी वैयक्तिक नसून पक्षाच्या वतीने केलेली आहे. भुजबळ बोलतो तेव्हा पक्षही बोलतो, हे लक्षात ठेवून मुनगंटीवारांनी यावर बोलण्याचे काही कारणच नाही. कुणी विचारले म्हणून काहीतरी उत्तर द्यायचे, अशी टीकाही भुजबळांनी मुनगंटीवारांवर केली. त्यामुळे आता भाजपचे दिल्लीतील नेते आणि राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करूनच महायुतीतील जागांचे योग्य वाटप होईल, असेही भुजबळांनी या वेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Chhagan Bhujbal, Sudhir Mungantiwar
Fadnavis Vs Pawar : पवारांनी सज्जड दम भरल्यानंतर शेळकेंच्या मदतीला धावून आले फडणवीस; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com