Chhagan Bhujbal News : नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्तही टळणार?

Lok Sabha Election 2024 News : "या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणुकीची तयारी केली होती."
Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा सातत्याने लांबणीवर पडत आहे. या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी यापूर्वीच निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा केव्हा होणार? याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे. (Lok Sabha Election 2024)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी निश्चित झाली आहे, असे सांगण्यात येते. याचेच विविध पडसाद राज्यभर उमटले आहे. नाशिकमधून काही मराठा संघटनांनी भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघ चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
BJP Vs Congress : काँग्रेस ठाकरे, पवारांसोबत भरकटली; सांगली, भिवंडीवरुन भाजपचा निशाणा

या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणुकीची तयारी केली होती. त्यांनी मतदारसंघात दोन प्रचारफेऱ्यादेखील पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यानंतर महायुतीतील अन्य घटक पक्षांनी आणि विशेषता भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यासाठी पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेचा आधार घेण्यात आला. या सर्वेचा अंदाज लक्षात घेऊनच खासदार गोडसे यांच्या ऐवजी मंत्री भुजबळ यांचे नाव पुढे आले होते.

आता भुजबळ यांच्या उमेदवारीबाबतदेखील मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय शक्तींकडून होत आहे. गेल्या दोन चार दिवसांमध्ये याबाबत विविध पर्याय पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाला देण्यात यावी. येथून भाजपचे आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारीची चर्चा आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचेही नाव चर्चेत आले. उमेदवारीच्या चर्चेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचेही नाव पुढे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सर्वे काय सांगतो? त्याचा आधार काय? याची नवी चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींत उमेदवारीची घोषणा सातत्याने लांबणीवर पडत आहे.

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
NCP Crisis News : शरद पवार गटाकडून 'घड्याळ'बाबत याचिका दाखल; अजित पवारांवर घेतला आक्षेप...

सध्या भारतीय जनता पक्ष कडून मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल यावर ऊहापोह सुरू आहे. त्यात यापूर्वी चर्चेत असलेले खासदार हेमंत गोडसे, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांसह अन्य उमेदवार मागे पडतात की काय याची चिंता इच्छुकांना सतावू लागली आहे.

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
NCP Ajit Pawar Group: भाजपला जोर का झटका; भुजबळ नसतील तर अरींगळेंना द्या उमेदवारी!

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. वाजे यांना आव्हान देऊ शकेल अशा उमेदवाराचा शोध सर्वे करून होणार आहे. त्यात आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे आधी ठरलेले मंत्री भुजबळ यांच्या उमेदवाराची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला तरी होईल का? याची उत्सुकता कायम आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com