BJP Vs Congress : काँग्रेस ठाकरे, पवारांसोबत भरकटली; सांगली, भिवंडीवरुन भाजपचा निशाणा

Lok Sabha Election 2024 : विश्वजित कदमांनी सांगलीसाठी प्रचंड ताकद लावली. भिवंडी राखण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी एकवटले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
BJP, Congress
BJP, Congress Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा असलेला तिढा सुटला आहे. ठाकरे गटास 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटास 10 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानंतर आघाडीतील MVA प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत जागावाटप अंतिम झाल्याचे घोषित केले. दरम्यान, सांगली आणि भिवंडीची जागा भांडण करूनही काँग्रेसला मिळाली नाही. यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी काँग्रेसला डिवचले आहे. तर उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. Pravin Darekar Attack On Mahavikas Aghadi.

महाविकास आघाडीत काँग्रेसचा Congress एकत्रित कार्यक्रम करण्याचीच भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली की काय, असे चित्र दिसत आहे. भिवंडीत खरा काँग्रेसलाच जनाधार आहे. मात्र ती जागा कुठलीही तडजोड न करता राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar गटाने घेतली. सांगलीत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. तेथे ठाकरे गटाने दावा ठोकून परस्पर उमेदवारही जाहीर केला. दरम्यान, विश्वजित कदमांनी सांगलीसाठी प्रचंड ताकद लावली. भिवंडी राखण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी एकवटले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. यातून राज्यातील काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबत भरकटत गेल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

स्वतः वसुली करणारे उद्धव ठाकरे Uddhav Thackeray दुसऱ्यांना खंडणीखोर म्हणतात. त्यांनी नेहमीप्रमाणे चंदा दो, चंदा लो, अशा प्रकारची अत्यंत बालिशपणाची विधाने केली. भ्रष्टाचाराचा आरोप मोदींवर किंवा भाजपवर करण्याची त्यांची सवयच आहे. यापूर्वी राज्यात खंडणी, वसुली कोणी केल्या. ज्यांचा बेसच हाव होता, त्यांनी आता खंडणीखोर बोलावे यापेक्षा दुर्दैव नाही, अशा शब्दात दरेकरांनी ठाकरेंचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP, Congress
Raj Thackeray News : "राज ठाकरे वाघ, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न"

दरेकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरमध्ये विकासावर भाष्य केले. मात्र पटोले यांनी मोदींनी लिहिलेली स्क्रिप्ट, कॅसेट रिपीट केल्याची टीका केली. यावर दरेकर म्हणाले, त्यांनी मोदींचे भाषण नीट ऐकलेले दिसत नाही. ते देशाला दिशा देणारे होते, देशाचे भविष्य सांगणारे होते. मतदारांना आत्मविश्वास देऊन मी तुमची जबाबदारी घेतो, मला आशीर्वाद द्या असे आश्वासक होते. मात्र आघाडी अत्यंत निरस, दिशाहीन, पोकळ झाली आहे. नेहमीप्रमाणे ठाकरेंनी टोमणे मारले. त्यांच्या पत्रकार परिषदेत तिघांची तोंड तीन दिशेला होती. उद्या निवडणुकीत काय होणार, हे स्पष्टपणे दिसत आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

BJP, Congress
Latur Lok Sabha Constituency : काँग्रेस भवनात विजयाच्या संकल्पाची गुढी उभारत अमित देशमुखांची चाय पे चर्चा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com