NCP Crisis News : शरद पवार गटाकडून 'घड्याळ'बाबत याचिका दाखल; अजित पवारांवर घेतला आक्षेप...

Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाकडून न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका...
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाला राजकीय प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवारांचा फोटो वापरू नये, असे आदेश न्यायालयाने दिले गेले होते. त्यानंतर पक्षाचे चिन्ह घड्याळाबाबत अजित पवार गटाला महत्त्वाचे आदेश देण्यात आले होते. अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी 'घड्याळ चिन्हाबाबतचे निकालाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असे 'ठळक' अक्षरात उल्लेख करावा लागणार आहे, असे न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचे पालन होत नसल्याचा आक्षेप घेत शरद पवार गटाने पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. जाहिरातींमध्ये घड्याळ चिन्ह वापरताना न्यायप्रविष्ट असल्याचा अजित पवार गट उल्लेख करत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला आहे. शरद पवार गटाचे विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय होतो न्यायालयीन आदेश?

कोर्टाच्या या आदेशानुसार शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले 'तुतारी वाजवणारा माणूस' लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत वापरता येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP Political Crisis News : अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन नाही! सुप्रीम कोर्टात याचिका

मात्र चिन्हाबाबत यापुढे अजित पवार (Ajit Pawar) गटाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रचार सभेत घड्याळ चिन्ह वापरताना एक नोट वापरावी लागणार आहे. घड्याळ चिन्हाच्या चित्रापुढे 'घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असा उल्लेख करावा लागणार आहे. ही नोट सर्वांना दिसेल अशा ठळक अक्षरात लिहावी, असेही कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com