Arvind Kejriwal News : केजरीवालांना जामीन मिळाल्याने भाजपला निवडणुकीत फटका बसेल का?

Aap On Bjp : भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवते, असा आरोप आपच्या नेत्यानं केला.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsarkarnama

Aam Aadami Party News : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ते आता लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) प्रचारात सहभागी होऊ शकतील. केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने पक्षाच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) प्रचारात सक्रिय आहेत. त्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करीत घोषणा दिल्या. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाचे नेते नविंदर सिंग अहलुवालिया यांनी सांगितले, "भारतीय जनता पक्ष ( Bjp ) विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवते. त्यांना जेलमध्ये टाकते. कारण, भाजप हा घाबरट नेत्यांचा पक्ष आहे. ते गैरव्यवहार करतात. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास घाबरतात. हे आता देशातील सर्व नागरिकांना कळून चुकले आहे."

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ‘मोदी पंतप्रधान झाले तर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकतील’, अरविंद केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ते आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होतील. महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होईल. महाविकास आघाडीच्या समारोपाच्या प्रचार सभेत मुंबई येथे केजरीवाल सहभागी होणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसेल, असा दावा या कार्यकर्त्यांनी केला.

( Edited By : Akshay Sabale )

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal News : तुरुंगांतून बाहेर येताच अरविंद केजरीवालांनी पीएम मोदींना ललकारलं; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com