Arvind Kejriwal News : तुरुंगांतून बाहेर येताच अरविंद केजरीवालांनी पीएम मोदींना ललकारलं; म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : आपल्या देशाला चार हजार वर्षांची परंपरा आहे. या देशावर कोणी हुकुमशाही थोपवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी येथील लोक ते सहन करत नाहीत. आताही देशात हुकुमशाहीचे वारे वाहत आहे. मी देशातील या हुकूमशाही विरोधात लढत आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi Political News : दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर ते तिहार तुरुंगात होते. आता त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याने ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना चॅलेंज दिले आहे.

केजरीवाल Arvind Kejriwal म्हणाले, आपल्या देशाला चार हजार वर्षांची परंपरा आहे. या देशावर कोणी हुकुमशाही थोपवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी येथील लोक ते सहन करत नाहीत. आताही देशात हुकुमशाहीचे वारे वाहत आहे. मी देशातील या हुकूमशाही विरोधात लढत आहे. आता उद्या शनिवारी (ता. 11) दिल्लीतील आम आदमी पाटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन झालेला सर्व प्रकार कथन करणार असल्याचा इशारा केजरीवाल यांनी दिला आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, तुरुंगातून मा‍झ्या सुटकेसाठी देशातील लोकांनी प्रार्थना केली. तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायामुळे आज मी तुमच्यासमोर आहे. त्यासाठी कोर्ट आणि लोकांचा आभारी आहे. आता आपण सर्वांनी मिळून देशातील हुकुमशाही विरोधात लढायचे आहे, असे आवाहनही केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडली; मुरलीधर मोहोळांना खासदारकी मिळवण्याआधीच करुन दिली 'ही' जाणीव !

यावेळी केजरीवाल यांच्यासोबत पत्नी सुनिता केजरीवाल Sunita Kejriwal, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपच्या दिल्लीतील मंत्री आतिषी आणि सौरभ भारद्वाज आणि आपचे सरचिटणीस संदीप पाठक उपस्थित होते. दरम्यान, अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर ते तिहार तुरुंगात होते. त्यापूर्वी त्यांना ईडीने नऊ वेळा समन्स बजावले होते. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Arvind Kejriwal
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अजितदादांची स्तुती; शरद पवारांसोबत राहूनही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com