Lok Sabha Election 2024 : 'माकप'ची समजूत काढताना जयंत पाटलांची दमछाक, जे.पी गावित आक्रमक

Dindori Lok Sabha Constituency 2024 : माकपने महाविकास आघाडीकडे दिंडोरी मतदारसंघाची मागणी केली मात्र, तडजोड म्हणून हिंगोली मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखविली होती.
jp gavit jayant patil
jp gavit jayant patil sarkarnama

Nashik News : दिंडोरी मतदारसंघासाठी ( Dindori Lok Sabha Constituency ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ( माकप ) अडून बसला आहे. त्यांनी थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांची मध्यस्थी ही निष्फळ ठरली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने येथून भास्करराव भगरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भगरे यांनी दोन आठवड्यांपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. हे सर्व सुरू असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांपासून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित ( jp Gavit ) या मतदारसंघासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रचारात मिठाचा खडा पडला आहे.

माकपने महाविकास आघाडीकडे ( Mahavikas Aghadi ) दिंडोरी मतदारसंघाची ( Dindori Lok Sabha Constituency ) मागणी केली होती. मात्र, तडजोड म्हणून महाविकास आघाडीने त्यांना हिंगोली मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखविली होती. त्यावर एकमत न झाल्याने महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केले. त्यात माकपला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. याबाबत माकपच्या राष्ट्रीय पॉलिट ब्युरोच्या नेत्यांची चर्चा करण्यात आली. पण, त्या चर्चेनंतर देखील स्थानिक नेत्यांचे समाधान झालेलं नाही. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारापुढे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार गावित ( jp gavit ) यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन याबाबत चाचपणी केली आहे. त्यांनी प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याचाही विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे माकपमध्ये दिंडोरी मतदारसंघावरून वादाची चिन्हे आहेत. ही बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी शनिवारी ( 20 एप्रिल ) दिंडोरी मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. माकपचे माजी आमदार गावित, डॉक्टर डी.एल.कराड व अन्य नेत्यांची ही चर्चा झाली.

आता हा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आघाडीचा धर्म केवळ माकपनेच पाळायचा का? माकपची मते हवीत, मात्र त्यांना जागा सोडायचे नाही हे धोरण बरोबर नाही, अशी नाराजी माकपचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता यानंतरची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या ओढाताणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मतदारसंघाचा प्रश्न कोण व कसा सोडवणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

jp gavit jayant patil
Nashik Loksabha Constituency: नाशिकमधून भुजबळांची माघार, पण अजित पवार गट अन् भाजपचं काय?

दिंडोरी मतदारसंघात शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रमुख राजकीय मुद्दा बनला आहे. या प्रश्नावर महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले आहे. त्यात माकपचा देखील सहभाग होता. शेतकऱ्यांची भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. त्यामुळे मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. त्यात माकपने बंडखोरीचे इशारे दिल्याने भारतीय जनता पक्षाला काही प्रमाण दिलासा मिळत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

jp gavit jayant patil
Vikhe Patil Vs Pawar: खोटं बोल पण रेटून बोल, हाच पवारांचा धंदा; विखेंचा पलटवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com