Nashik Loksabha Constituency: नाशिकमधून भुजबळांची माघार, पण अजित पवार गट अन् भाजपचं काय?

Loksabha Election 2024 : मंत्री भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली मात्र त्यांच्या पक्षाचा दावा अद्यापही कायमच...
Chhagan Bhujbal hemant godse
Chhagan Bhujbal hemant godsesarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ हे सर्वात प्रबळ उमेदवार होते. याच मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील इच्छुक आहेत. भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. यामध्ये उमेदवारी कोणाला? हा आता महायुतीच्या वरिष्ठांच्या अखत्यारीतील विषय झाला आहे.(Nashik Loksabha Election 2024)

नाशिक मतदारसंघाचा तिढा गेले तीन आठवडे सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने हा मतदारसंघ मागितला होता. भारतीय जनता पक्षाने देखील या मतदारसंघावर दावा केला होता. या दोन्ही पक्षांकडून अंतिमतः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या नावावर एकमत झालेले दिसत होते. मात्र, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने हा आपला मतदारसंघ आहे. तो सोडण्यास नकार दिला त्यातून महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे प्रदीर्घकाळ चर्चा होऊ नये याबाबतचा निर्णय झाला नव्हता.

Chhagan Bhujbal hemant godse
Ajit Pawar News : अजित पवारांनी इंदापुरात केलेल्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल; कारवाई होणार?

यातून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी (ता.19) नाट्यमय घडामोडी घडल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. आपला या मतदारसंघातील उमेदवारीवरील दावा मागे घेत असल्याचे जाहीर केले. हे करताना त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न देखील केला. मी कधीच उमेदवारी मागितली नव्हती. भाजपचे नेते अमित शाह यांनी माझी उमेदवारी सुचवली होती. असे सांगून त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, याचा अर्थ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या शब्दाला अर्थ राहिला नाही असा संदेश दिला आहे.

दुसरीकडे मी माघार घेतली याचा अर्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाने माघार घेतली असा होत नाही. नाशिक मतदारसंघावर त्यांचा दावा अद्यापही कायम आहे,असेही भुजबळ यांनी सांगितले. यातून त्यांनी शिंदे गटाची दुहेरी कोंडी केलेली दिसत. मुख्यमंत्र्यांनी भाजप केंद्रीय नेतृत्वाचा शब्द पाळला नाही, असा त्याचा अर्थ होतो. दुसरे जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही, कारण अजित पवार Ajit Pawar गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही. या दोन्ही स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुटका झालेली नाही, असे स्पष्ट होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता नाशिकचा मतदारसंघ महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षाकडून देखील प्रतिष्ठेचा केला जाण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या राजकीय नियोजनात व्यत्यय येऊ नये, ही जबाबदारी भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांवर असेल. अजित पवार गटाने नाशिक मतदार संघ वरील दावा सोडलेला नाही.

त्यामुळे नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळावी यासाठी त्यांना भाजपची ही मदत मिळू शकते. या स्थितीत पुन्हा प्रबळ उमेदवार आणि गृहमंत्री शहा यांनी सुचविलेला उमेदवार म्हणून मंत्री भुजबळ यांना उमेदवारीसाठी आग्रह होऊ शकतो. त्याचबरोबर माजी खासदार समीर भुजबळ आणि शेफाली भुजबळ यांचे देखील संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे.

मंत्री भुजबळ यांनी उमेदवारीच्या मागणीसाठी माघार घेतली आहे. या गोष्टी नंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. या गोष्टी नंतर लगेचच शिंदे गटाकडून खासदार गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झालेले नाही. या घोषणेला २४ तास उलटले आहेत. मात्र नाशिक मतदार संघाचे धोरण काय? हा मतदारसंघ महायुतीच्या कोणत्या पक्षाला मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Chhagan Bhujbal hemant godse
Sanjay Daine : निःशब्द...! वडिलांवर अंत्यसंस्कार करून 'साहेब' परत ऑन इलेक्शन ड्यूटी

खासदार हेमंत गोडसे Hemant Godse गेले सहा महिने निवडणुकीच्या तयारीत व्यस्त होते. त्यांनी सहज उमेदवारी मिळेल आणि आपला प्रचार सुरू होईल, असा अंदाज केला होता. त्यांच्या उमेदवारीला एवढा विरोध होईल हे त्यांच्या मनातही नव्हते. विशेषतः अचानक अजित पवार गटाचा या जागेवरील दावा आणि भुजबळ यांची उमेदवारी हे त्यांच्या मार्गात एवढे मोठे गतिरोधक बनले. त्यांची उमेदवारीची गाडी या गतिरोधकात अडकून पडली आहे.

यामध्ये सहकारी पक्षांकडून दबाव आल्यास उमेदवारीसाठी पर्यायी नाव पुढे येण्याची शक्यता देखील आहे. त्यात शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर Vijay Karanjkar यांसह भाजपतील काही मंडळी देखील आतुर आहेत. त्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली तरीही गोडसे यांना त्याचा काहीही राजकीय दिलासा मिळू शकलेला नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Chhagan Bhujbal hemant godse
MLA Nilesh Lanke News : होय...मी गुंड आहे!'; नीलेश लंके कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com