Dhule Constituency 2024 : काँग्रेस उमेदवार शोभा बच्छावांच्या मार्गात बंडखोरांनी पेरले काटे...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बंडखोरांची समजूत घालण्यात ठरले अपयशी..
Dhule Constituency 2024
Dhule Constituency 2024Sarkarnama

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र शोभा बच्छाव यांच्या विरोधात स्थानिक नेत्यांनी असहकार पुकारला आहे. जिल्हाध्यक्षांनी बंड केले आहे. ही बंडखोरी थोपवण्यात पक्षाला यश आलेले नाही. त्यामुळे आता काँग्रेसपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी काल धुळे येथे मेळावा झाला. या मेळाव्यात राजीनामा दिलेले जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी सहभागी व्हावे, यासाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सनेर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र सनेर यांनी बंडखोरीवर ठाम राहत प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला. अन्य काही नेत्यांची ही भूमिका ताठर आहे. त्यामुळे उमेदवार डॉक्टर बच्छाव यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धुळे आणि मालेगाव येथील दोन्ही जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर या नेत्यांना पक्षात कार्यरत करण्यासाठी झालेले सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत. मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे हे देखील प्रचारात सहभागी झालेले नाहीत. मालेगाव येथील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे अन्य नेते देखील अद्याप तटस्थ आहेत. त्यामुळे काँग्रेस पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसात निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न अद्याप सुरूच आहेत.

Dhule Constituency 2024
Dhule Constituency 2024 : 'मी खानदेश कन्या, धुळे माझी जन्मभूमी' शोभाताई बच्छावांनी विरोधकांवर डागली तोफ

काँग्रेस नेते थोरात (Balasaheb Thorat) यांनी सनेर यांना त्यांच्या नाराजी विषयी समजूतदारपणा दाखविण्याचे आवाहन केले. सध्या धुळे मतदारसंघात पक्षाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराबाबत व्यक्तिगत नाराजी न ठेवता पक्ष हिताचा विचार करावा. असे आवाहन केले. मात्र सनेर यांनी आपण प्रचारात सहभागी होणार नाही. याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेतल्यानंतरच निर्णय होईल. त्यासाठी 3 मेपर्यंत प्रतीक्षा करावी असे नेत्यांना सुनावले.

Dhule Constituency 2024
ShahajiBapu Vs Jankar : फडणवीसांना भेटूनही उत्तम जानकर शरद पवारांकडे का गेले?; शहाजीबापूंची मार्मिक टिप्पणी...
Dhule Constituency 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघात (LOk Sabha) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमुळे नाराज नेत्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते देखील प्रयत्न करीत आहेत. मात्र अद्याप त्यात यश आलेले नाही. त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या नेत्यांना संघटित करण्याचे आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. बच्छाव आणि त्यांचे समर्थक याबाबत जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्यात किती यश येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com