Dr. Shobhatai Bachhav News : काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी काल धुळे येथे बैठक घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला अपवाद वगळता सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
डॉ. बच्छाव यांना काँग्रेस पक्षाची Congress उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्या मतदारसंघाबाहेरच्या आहेत, असा प्रचार सुरू केला होता. त्याला डॉक्टर बच्छाव Shobha Bacchav यांनी सडेतोड उत्तर दिले.
या वेळी डॉक्टर शोभाताई बच्छाव Shobha Bacchav म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाचे BJP कार्यकर्ते आणि नेते खोटा प्रचार करतात. त्यांना ती सवयच आहे. मात्र, जनता अशा प्रचाराला बोलणार नाही. गेल्या दहा वर्षांत भाजपने धुळे मतदारसंघासाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. केवळ भूलथापा मारल्या आहेत. धुळे शहराचे Dhule अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारसंघाच्या विकास आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मी लोकसभेत जाण्यासाठी मतदारांचा कौल घेत आहे. मतदारांचा पाठिंबा निश्चितच मला मिळेल.
त्या म्हणाल्या, भाजपचे लोक म्हणतात मी बाहेरची आहे. मात्र माझा जन्म धुळे येथे झाला आहे. धुळ्यातच माझे शिक्षण झाले. धुळे हे माझे आजोळ आहे. माझं माहेर मालेगाव आहे. कसमादेमध्ये माझे सासर आहे. मी धुळ्याची पालकमंत्री राहिली आहे. पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत धुळे शहराच्या Dhule विकासाचे अनेक प्रश्न मी सोडविले. धुळे शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मी नवीन नाही. त्यांच्याशी माझा नियमित संपर्क आहे. त्यामुळे मला बाहेरची म्हणणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे BJP Government सरकार शेतकरी आणि गरिबांच्या विरोधातील आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत तीव्र स्वरूपात पुढे येत आहेत. कांदा निर्यातबंदीपासून तर शेतमालाला भाव मिळत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी कोणत्याही प्रयत्न होत नाही. त्यामुळे जनता भाजप सरकारला कंटाळली आहे. यंदा जनता हमखास परिवर्तन करेल, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
या वेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी खासदार बापू चौरे, प्रतिभा शिंदे, माजी आमदार डी. एस. अहिरे, शिवसेनेचे महेश भाऊ मिस्त्री, हिलाल माळी, माजी महापौर भगवान करणकाळ, रमेश श्रीखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र मराठे, समाजवादी पक्षाचे गुड्डू भाऊ, जमील मंसूरी, हेमंत भदाणे, महेश घुगे आदी उपस्थित होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.