Heena Gavit: एक्झिट पोलनंतर हिना गावितांचे सेलिब्रेशन सुरु; तळोदा येथे झळकले 'भावी केंद्रीय मंत्र्यां'चे बॅनर

Nandurbar Lok Sabha Election 2024 Exit Polls: हिना गावित यांच्यामुळे अनेकांना घरकुले मिळाली, अनेक योजनांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे. निकालानंतर त्या केंद्रीय मंत्री बनतील...
Nandurbar Lok Sabha Election 2024 Exit Polls
Nandurbar Lok Sabha Election 2024 Exit PollsSarkarnama

सागर निकवाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुड बुक मधील खासदार अशी ओळख असलेल्या डॉ. हिना गावित विजयाची हॅट्रिक करणार असल्याचे एक्झिट पोलवरुन दिसते.प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा व तिला मिळालेला मोठा प्रतिसाद त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा स्थितीत हिना गावित या विजयी होतील, असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केल्यानंतर गावित यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे.

नंदुरबार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांच्या एका बॅनरवरने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. तळोदा शहरातील मुख्य चौकात निकालाआधीच हिना गावित यांचा 'भावी केंद्रीय मंत्री' असा उल्लेख असलेला फलक बिरसा मुंडा चौकात लावला आहे. त्यांची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

चिनोदा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी हा फलक लावला आहे. हिना गावित यांच्यामुळे अनेकांना घरकुले मिळाली, अनेक योजनांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे. निकालानंतर त्या केंद्रीय मंत्री बनतील, असा विश्वास राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नंदुरबार मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 मध्ये भाजपच्या डॉ. गावित यांनी तो मोदी लाटेत काबीज केला. गेल्या निवडणुकीतही हिना गावित दुसऱ्यांदा विजयी झाल्या. यंदा त्या तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे काँग्रेसने गोवाल पाडवी हा फ्रेश चेहरा दिला आहे. पाडवी यांच्यावर टीका करावा, असा एकही मुद्दा भाजपकडे नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक अतिशय वेगळी ठरण्याची चिन्हे आहेत.

हिना गावित यांनी मैदान मारलं तर त्यांना मंत्रीपद मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. गेल्या टर्ममध्ये हिना गावित यांचं मंत्रिपद खासदार भारती पवार यांच्यामुळे हुकलं होतं, यावेळी मात्र हिना गावित यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nandurbar Lok Sabha Election 2024 Exit Polls
Somanath Bharati: एक्झिट पोल ठरणार खोटे ; मोदी तिसऱ्यांदा PM झाले तर मुंडन करेन!

स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच काँग्रेसचे विचारांचा खासदार निवडून देण्याचा नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास आहे. काँग्रेसचा हा बालेकिल्ला 2014मध्ये डासळला. 2019 मध्ये सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी त्याचं मताधिक्य कमालीचं घटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नंदुरबारच्या जागेवर (Nandurbar Lok Sabha 2024) काँग्रेस अद्याप प्रचंड आशावादी आहे. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय तीव्रतेने काँग्रेसच्या प्रचारात होते.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com