लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे चित्र आहे.
पोलनुसार मोदी हे हॅटट्रिक साधणार असल्याचे चित्र असले तरी आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती (somanath bharati) यांनी पोलचा हा दावा खोडून काढला आहे. सोमनाथ भारती यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहेत.
"जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करणार आहे. हे शब्द लक्षात ठेवा, सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार,मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणं शक्य नाही," असे सोमनाथ भारती यांनी एक्सवर म्हटलं आहे.
इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आप या पक्षांनी दिल्लीतील ७ जागांपैकी प्रत्येकी ४ आणि ३ जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. याच दिल्लीतून समोर येणाऱ्या एक्झिट पोलनुसार भाजपा दिल्लीत ५ ते ७ जागांवर विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवणार असल्याचे समजते.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे पोलवरून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी एक्झिट पोलचे आकडेवारी खोटी ठरणार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस आणि आप या पक्षांनी दिल्लीतील ७ जागांपैकी प्रत्येकी ४ आणि ३ जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. एक्झिट पोलनुसार भाजपला दिल्लीत ५ ते ७ जागा मिळणार असल्याचे म्हटलं आहे. पोलचे हे अंदाज चुकीचे असून दिल्लीत इंडिया आघाडीच येणार असल्याचा विश्वास सोमनाथ भारती यांना आहे.
सोमनाथ भारती हे नवी दिल्ली येथून निवडणूक लढत आहेत. त्यांची लढत बांसुरी स्वराज यांच्याशी आहे. बांसुरी स्वराज या भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या असून त्या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.