Hemant Godse News : नाशिकवरून गोडसेंनी भाजपला सुनावलं; इलेक्टिव्ह मेरीट कुणाकडं तेच सांगितलं...

Nashik Lok Sabha Constituency : पालकमंत्री दादा भुसे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह खासदार गोडसे यांनी नाशिक मतदारसंघ शिंदे गटालाच मिळावा, यासाठी जोरदार बॅटिंग केली.
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama

Lok Sabha Election 2024 : खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाशिकची जागा मिळावी, असा आग्रह धरला. निवडणुकीसाठी शिंदे गटाकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे. ते अन्य सहकाऱ्यांकडे नाही असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ही जागा मुख्यमंत्री शिंदेंच्याच वाट्याला येईल, अशी आशा हेमंत गोडसेंना अद्यापही आहे. Hemant Godse Confidence of Win From Nashik Lok Sabha Constituency

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik) जागा वाटपाबाबतचा वाद बुधवारी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचला. पालकमंत्री दादा भुसे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह खासदार गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिक मतदारसंघ शिंदे गटालाच मिळावा, यासाठी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी केलेल्या बिनतोड मांडणीला मुख्यमंत्री शिंदे यांनीही दाद दिली. मतदारसंघ मिळावा असा प्रयत्न मी करीन असा शब्द त्यांनी दिल्याचा दावा खासदार गोडसे यांनी केला.

Hemant Godse
Sangli Congress Politics : काँग्रेसच्या प्रचाराची धुरा असलेल्या विश्वजीत कदमांचा लेटरबॉम्ब; थेट नानाभाऊंनाच इशारा

यावेळी भारतीय जनता पक्षाने (BJP) केलेला दावा खोडण्यात आला. मतदारसंघ मागणी करताना आमदारांची संख्या नव्हे, तर इलेक्टिव्ह मेरिट महत्वाचे असते. 2014 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरात तीन आमदार आणि 40 नगरसेवक होते. मात्र मनसेच्या उमेदवाराला अवघे 63 हजार मते मिळाली होती. हे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. शिंदे गटाचे उमेदवार खासदार गोडसे यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटालाच मिळावी अशी अग्रही भूमिका त्यांनी मांडली.

Hemant Godse
Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे 'वंचित'चे उमेदवार, पुण्यात मोहोळ- धंगेकर- तात्यांमध्ये होणार तिरंगी लढत

नाशिक मतदारसंघामधून हेमंत गोडसे 2014 मध्ये एक लाख 83 हजार मतांनी विजयी झाले होते. 2019 मध्ये त्यांचे मताधिक्य 2.93 लाख होते. त्यामुळे नगरसेवकांची संख्या आणि आमदारांची संख्या याला महत्त्व नाही. मतदारांनी एकदा निवडणूक हाती घेतली की, आमदार आणि अन्य घटक प्रभावी ठरत नाहीत. शिंदे गटाने अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या मतदारसंघात पक्षाची बांधणी केली आहे. त्याची परिणीती म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी अतिशय सक्षम यंत्रणा उभी करण्यात पक्षाला यश आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा 400 पार अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 45 प्लस असा निर्धार आहे. त्या दृष्टिकोनातून नाशिकची जागा जिंकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही जागा आपल्याकडेच ठेवण्यात यावी, असा युक्तिवादही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला. यावेळी जयंत साठे, राजू लवटे, गणेश कदम, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले महानगर प्रमुख बंटी तिदमे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Hemant Godse
Sasoon Hospital News : मृत रुग्णाला उंदीर चावल्याचा ससूनच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट; डीन म्हणतात, 'समिती स्थापन करुन...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com