Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे 'वंचित'चे उमेदवार, पुण्यात मोहोळ- धंगेकर- तात्यांमध्ये होणार तिरंगी लढत

Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरेंना उमेदवारी दिल्यामुळे पुणे मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असून आता पुण्याची निवडणूक तिरंगी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला होता.
Prakash ambedkar, Vasant More
Prakash ambedkar, Vasant More Sarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Election: पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वसंत मोरेंना (vasant More) उमेदवारी दिल्यामुळे पुणे मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असून आता पुण्याची निवडणूक तिरंगी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेला (MNS) अखेरचा 'जय महाराष्ट्र' केलेल्या वसंत मोरेंनी (Vasant More) अनेक पक्षांच्या वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, यावेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून मोरे यांना वंचितकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. (Prakash Ambedkar Announced Candidacy Vasant More)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे सोडल्यापासून महाविकास आघाडीच्या कोट्यातून वसंत मोरेंना पुणे लोकसभेची जागा मिळू शकते, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची उमेदवारी जाहीर केली. धंगेकरांच्या उमेदवारीमुळे मोरेंना आघाडीतून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. तर मोरे यांनी उमेदवारीसाठी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांपासून शरद पवारांची (Sharad pawar) भेट घेतली होती. तसेच त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचीही भेट घेतली होती.

Prakash ambedkar, Vasant More
Pune Loksabha 2024 News : पुणे लोकसभा महाविकास आघाडीचा उमेदवार आठवी पास !

नव्या राजकारणाची सुरुवात

वसंत मोरे यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी सूचक वक्तव्य केलं होतं. वसंत मोरे यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल, ती कोण कोण करणार आहे. हे अधिकृतरित्या काही दिवसांतच सर्वांसमोर मांडू. काही चर्चा आताच जाहीर करू शकत नाही. असं आंबेडकर म्हणाले होते. त्यानुसार आज आंबेडकरांनी मोरे यांना उमेदवारी जाहीर करुन नव्या राजकारणाची सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.

Prakash ambedkar, Vasant More
Pune LokSabha : मिल बैठे तीन यार.. सुनीलअण्णा, जगदीशभाऊ अन् बापू..!

मोहोळ-धंगेकर-तात्यांमध्ये होणार तिरंगी लढत

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने भाजपच्या मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असं वाटत होतं. मात्र, आता वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीरे केल्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com