Lok Sabha Election 2024: 'अशी' होणार मतमोजणी, नगरकरांची उत्सुकता शिगेला

Nagar South and ShirdiLok Sabha constituency: चौथ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत झाली. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता मतमोजणी कशी आणि कुठे होणार, याबाबच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Nagar Dakshin Lok Sabha 2024
Nagar Dakshin Lok Sabha 2024Sarkarnama

Nagar Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून होणार असून या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. चौथ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत झाली. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता मतमोजणी कशी आणि कुठे होणार, याबाबच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

नगर जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची नगर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या राज्य वखार महामंडळाच्या दोन गोदामांमध्ये तयारी केली आहे. तर ही मतमोजणी विधानसभा मतदारसंघानिहाय 16 टेबलांवर होणार असून, त्यासाठी 768 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नगर दक्षिणच्या लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या थेट लढत झाली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) 'वंचित'ने एन्ट्री केल्याने तिथे चुरशीची आणि तिरंगी लढत झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिथे महायुतीतील शिवसेना (Shivsena) उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 66.61 टक्के तर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात 63.03 टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही मतदारसंघात एकूण 23 लाख 77 हजार 466 एवढे मतदान झाले आहे.

मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर चार अधिकारी असणार आहेत. या अधिकारी आणि कर्मचारी यांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणी आहे. यासाठी 16 टेबल असतील. तर पोस्टल मतदान मोजणीसाठी दोन टेबल स्वतंत्र असतील. प्रत्येक टेबलावर एक पर्यवेक्षक असणार आहे. एक सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई यांची नियुक्ती प्रत्येक टेबलावर करण्यात आली आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघाच्या (Nagar South and Shirdi constituency) मतमोजणीसाठी एकूण 768 अधिकारी आणि कर्चमारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना तिथे उपस्थित राहण्यासाठी नियुक्ती पत्रांची लवकरच कार्यवाही होणार आहे.

Nagar Dakshin Lok Sabha 2024
EVM News : ईव्हीएम मध्ये गडबड होऊ नये यासाठी उमेदवारांनी लढवली शक्कल !

राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मत यंत्रे ठेवली गेली आहे. या यंत्रणाची काळजी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. नगर जिल्ह्यात सध्या वादळी वारे, पाऊस होत आहे. गोदामाच्या छतावरील पत्रांवर प्लास्टिकचा कागद टाकून खबरदारी घेतली गेली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. यासाठी महावितरणकडून वारंवार तपासणी केली जात आहे. तसेच मतदान यंत्रे असलेल्या गोदामाभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून 'सीसीटीव्ही'ची (CCTV) व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com