Narhari Zirwal News : पुन्हा शरद पवारांकडे जाणार? 'त्या' फोटोमागचं सत्य काय? अखेर झिरवळ बोललेच...

Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या स्टेजवर झिरवळ दिसल्यानं खळबळ उडाली होती.
Narhari Zirwal
Narhari Zirwalsarkarnama

Nashik News, 11 May : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ( Dindori Lok Sabha Constituency ) महायुतीतील मित्र पक्षांचे आमदार प्रचारात सहभागी होत नसल्याची तक्रार केली जात आहे. यातच दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे ( Bhaskar Bhagre ) यांच्या प्रचारसभेला विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ ( Narhari Zirwal ) यांनी हजेरी लावली. यामुळे झिरवळ घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, आता झिरवळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार भारती पवार ( Bharti Pawar ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार भास्कर भगरे यांच्यात थेट लढत होत आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारात अजित पवार गटातील आमदार सक्रिय होत नसल्याची ओरड सुरू आहे. यातच तिसगाव ( ता. दिंडोरी ) येथे मारूती मंदिराच्या जीर्णोद्वारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या नरहरी झिरवळ यांनी तेथे सुरू असलेल्या भास्कर भगरे यांच्या प्रचारसभेलाही हजेरी लावली.

व्यासपीठावर भास्कर भगरे, ज्येष्ठ नेते, श्रीराम शेटे यांनी स्थानपन्न होत श्रोत्याची भूमिका निभावली. याचे छायाचित्र समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीच्या प्रचारसभेला व्यासपीठावर हजेरी लावणारे झिरवळ यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी साथ सोडत शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे बोट पुन्हा धरल्याची चर्चा रंगली होती. याची भाजपकडूनही दखल घेतल्याचं बोललं जात आहे.

या फोटोवर नरहरी झिरवळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा ज्या गावात प्रचार सुरू होता, तिथे मला पूजेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगाव येथे गेलो होतो. फक्त लोकांच्या आग्रह खातर मी खुर्चीवर बसलो," असं झिरवळ यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com