Lok Sabha Election 2024 : पंकजा सुजयसाठी आल्या अन् बीडचं विषारी राजकारण सांगून गेल्या...

Sujay Vikhe News : माझ्यासाठी मोहटा देवीला ओटी भरा. भगवानबाबांना आशीर्वाद घ्या. याचबरोबर सुजय विखेंना लोकसभेला पाठवण्याची तयारी करा.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Ahmednagar News : भाजप नेत्या पंकजा मुंडे पाथर्डीत सभा घेत बीड लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती सांगून गेल्या. 'माझ्यासाठी मोहटा देवीची ओटी भरा. भगवानबाबांचा आशीर्वाद घ्या. याचबरोबर सुजय विखेंना लोकसभेला पाठवण्याची तयारी तयारी करा. मला माझ्यासाठी मतदारसंघात जायचे आहे. तिथे मीच मला वाचवू शकते. मला निवडणूक खेचायची आहे', असे म्हणत पंकजांनी बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोपी नसल्याचे सांगून गेल्या.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची पाथर्डीत सभा झाली. शालिनी विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, धैर्यशील माने आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी स्वतः कितीही संकटात असले आणि माझ्या जिल्ह्यात कितीही जातीवादाचा विषारी राजकारण होत असले, तरी मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे, हे लक्षात ठेवा. मी एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी आली आहे. जात-पात-धर्म कधी पाहिलेच नाही. तशी मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवणच नाही". माझ्यासाठी मोहटा देवीला ओटी भरा. भगवानबाबांना आशीर्वाद घ्या. याचबरोबर सुजय विखेंना लोकसभेला पाठवण्याची तयारी करा. भाषण करण्याची गरज आहे का? असे विचारून मला पु्न्हा हेलिकाॅप्टरने मतदारसंघात जायचे आहे. तिथे मीच मला वाचवू शकते. मला निवडणूक खेचायची आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना देखील प्रचारासाठी दोन दिवस येण्याचे आमंत्रण पंकजा मुंडे यांनी दिले.

'तुमचं वादळ सहन होणार नाही'

माजलगावला असताना हेलिकाॅप्टर उडायचे नाही, अशी परिस्थिती होती. वादळ, वारा सुरू होता. पावसाची स्थिती होती. ढगाळ वातावरण होते. पायलट देखील हेलिकॉप्टर उडवायला तयार नव्हता. शेवटी असे ठरवले होते की, आॅनलाईन भाषण करायचे. यासाठी सुजय विखे तयार झाले. पण मीच म्हणाले, असे काही करू नको. लोकं म्हणतील, ताई आल्याच नाही. गडबड होईल. त्याच्यामुळे जीव मुठीत धरून हेलिकाॅप्टरने वादळ-वारा सहन करून आम्ही आलो. कारण आलो नसतो, तर तुमचं वादळ सहन होणार नव्हतं, असे पंकजा (Pankaja Munde) यांनी म्हणताच, सभेतील लोकांमध्ये हशा पिकला.

Lok Sabha Election 2024
BJP Politics : दिंडोरीत शरद पवारांच्या कोंडीसाठी भाजपने 'असा' टाकला डाव

राधाकृष्ण साहेबांनी मुलासाठी तळमळ -

राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) यांची मुलाविषयी खूप तळमळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. सुजयसाठी बंधू धनंजय मुंडे देखील येऊन गेले. माझी सभा झाली नाही, तर भागत का?, असे सांगत मला बीडमध्ये प्रोब्लेम आहे. पण राधाकृष्ण विखे साहेबांना वचन दिले होते. त्यांची मुलाविषयी खूप तळमळ आहे. त्यामुळे यावेच लागले, असे पंकजा यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com