Pankaja Munde News : मराठा आंदोलनाच्या नेतृत्वावर पंकजा मुंडेंनी घेतली शंका

Beed Lok Sabha election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात मराठाविरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले आहे.
pankaja munde maratha reservation
pankaja munde maratha reservationsarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी बीड लोकसभा मतदारसंघात ( Beed Lok Sabha Constituency ) मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही, असे सांगून आंदोलनाला चांगली दिशा देण्यासाठी ताकदवर नेतृत्वाची गरज व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनी विधान करत मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली आहे.

पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी झाली. पुणे-नगर असा दौरा करत त्या शुक्रवारी बीडमध्ये दाखल झाल्या. बीडमध्ये पंकजा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनासाठी बाइक रॅलीदेखील काढली. या स्वागताने पंकजा मुंडे भारावून गेल्या. बीड मतदारसंघात त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या खासदार होत्या. पक्षाने त्यांना बाजूला करत पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. भाजप असे करून मुंडे परिवारातील भगिनींमध्ये वाद तर लावत नाही ना, अशीदेखील चर्चा आहे. यामागे पंकजा यांचे पुनर्वसन करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा 2019 मध्ये पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे या राजकारणापासून बाजूला पडल्या होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात मराठाविरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर पंकजा यांनी मोठे विधान केले आहे. "बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही. आंदोलनाला दिशा देण्यासाठी चांगल्या ताकदवर नेतृत्वाची गरज आहे. दररोज माझी जात काढली जात असेल, तर दुर्दैवी आहे", असे पंकजा यांनी म्हटले आहे.

pankaja munde maratha reservation
Pankaja Munde On Pritam Munde : प्रीतम यांना आता कुठली संधी मिळणार? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जागा आहे. शरद पवारांकडून येथे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांचे नाव शरदचंद्र पवार पक्षाकडून आघाडीवर आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील बजरंग सोनवणे यांनीदेखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे बीड मतदारसंघात शरद पवार नेमका कोणता पत्ता खोलतात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

pankaja munde maratha reservation
Pankaja Munde : पुनर्वसन की नवी खेळी? बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com