Pankaja Munde : पुनर्वसन की नवी खेळी? बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी!

Pritam Munde विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र...
Pankaja Munde News :
Pankaja Munde News :Sarkarnama

Beed Lok Sabha Constituency दोनच महिन्यापूर्वी परळीत ‘मी बहीण प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणुक लढविणार नाही, असे निक्षूण सांगणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याच गळ्यातच अखेर बीड लोकसभेची भाजपच्या उमेदवारीची माळ पडली आहे. यामुळे ‘दबंग खासदार’, विक्रमवीर खासदार अशा घोषणा देणाऱ्या डॉ. प्रीतम मुंडेंच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

बुधवारी भाजपने राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. यात विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी टाळून पंकजा मुंडेंच्या(Pankaja Munde) नावावर शिक्कामोर्तब केले. बीडमध्ये झालेल्या महायुतीच्या मित्रपक्षांच्या मेळाव्यात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शिवसंग्रामच्या नेत्यांनी डॉ. प्रीतम मुंडेच लोकसभेच्या उमेदवार असतील व तिसऱ्यांदा संसदेत पोचतील असे म्हणून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून दिली होती.

डॉ. मुंडेंनीही ‘भाजपच्या संस्कृतीनुसार आपण स्वत:ची उमेदवारी जाहीर करणार नाही’ पण सर्वांच्या भावनेचा आदर करुन आपण उमेदवार असल्याचे स्वीकारते, असे जाहीर सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde News :
Marathwada BJP News : भाजपचे नो रिस्क, मराठवाड्यात तीनही विद्यमान खासदारांना उमेदवारी, बीडमध्ये भाकरी फिरवली..

तर, परळीतील एका कार्यक्रमावेळी पंकजा मुंडेंनीही ‘मी प्रीतम मुंडेंच्या जागेवर लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे निक्षूण सांगितले होते. मात्र, बदलती राजकीय समिकरणे व परिस्थितीनुसार अखेर पंकजा मुंडे यांनाच उमेदवारी मिळाली. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्यांचा आमदार त्या पक्षाची जागा असे समीकरण ठरले तर परळीची जागा सहाजिकच धनंजय मुंडे(Dhananjay Munde) लढविणार. त्यामुळे पंकजा मुंडेंचे काय, असा पेच तर पक्षासमोर होताच.

शिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभेसाठी भाजपने पंकजा मुंडेंना कायम टाळले ही त्यांच्या समर्थकांची भावना व भाजप नेतृत्वाबद्दल असलेला संताप दूर करण्याची खेळी आणि पंकजा मुंडेंना लोकसभा उमेदवारी देत राज्याच्या वर्तुळातून केंद्राच्या राजकारणात पाठवत महाराष्ट्रातील एक स्पर्धक दूर करण्याची राज्य भाजपच्या नेत्यांची खेळीही या निमित्ताने साध्य झाली आहे.

Pankaja Munde News :
Muralidhar Mohol : लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत मोहोळ का ठरले सरस?

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडेंच्या अपघाती निधनानंतर 2014 च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय फडात उतरलेल्या डॉ. मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. मागच्या निवडणुकीतही त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. मुंडेंनी विकास कामांची भूमिपुजने, लोकार्पण, उद॒घाटनांच्या निमित्ताने संपर्क वाढविला होता. त्यांना सहज संपर्क साधता येतो, त्या सहज उपलब्ध होतात, त्यामुळे त्यांनाच उमदेवारी मिळेल, असा त्यांच्या चाहत्यांचा आशावाद फोल ठरला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com