Lok Sabha Election 2024 : उच्चांकी मतदान मिळेल, विरोधक हतबल झाले; खासदार सुजय विखेंचा दावा

Lok Sabha Election 2024 Voting Updates : मोदींच्या या सभेला एक लाखापेक्षा अधिक लोक जमतील, असा विश्वास व्यक्त करीत विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळून सुजय विखे यांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama

Ahmednagar News : विरोधकांकडून महिनाभर नियमित बिनबुडाचे आरोप करण्यात आले. आता त्यांच्याकडे मुद्दे उरले नाहीत. विरोधक हतबल झाले आहे, असा दावा करीत येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानात पंतप्रधान नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदार आपल्याला उच्चांकी मतदान करतील, असा विश्वास भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा नगर शहरातील निरंकारी भवनशेजारील मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभास्थळावर पंतप्रधान मोदी यांच्या आगमन होण्यापूर्वी महायुतीचे उमेदवार खासदार विखे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार सुजय विखे म्हणाले, "विश्व नेते अशी प्रतिमा स्थापित केलेल्या नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तीन वेळेस आले. नरेंद्र मोदींची ही माझ्यासाठी दुसरी सभा आहे. मोदींच्या नेतृत्वाचे आकर्षण असलेला समाजात मोठा वर्ग आहे". मोदींच्या या सभेला एक लाखापेक्षा अधिक लोक जमतील, असा विश्वास व्यक्त करीत विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळून सुजय विखे यांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.

Lok Sabha Election 2024
Loksabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात ; अपक्ष उमेदवाराची निशाणी 'तुतारी'

खासदार विखे म्हणाले, "व्यक्तीचे जे बॅकग्राऊंड असते त्यानुसारच व्यक्तीचे वागणे बोलणे असते. समोरच्या विरोधी उमेदवाराने आपल्या बॅकग्राउंडनुसार मागील महिनाभरापासून प्रचाराच्या दरम्यान आपल्यावर आरोप प्रत्यारोप केले. आरोपासाठी होता नव्हता तेवढा गोळा बारूद त्यांच्याकडील आता संपला आहे. आता आरोप करण्यासाठी मुद्देच शिल्लक राहिले नाहीत". आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर लोकांना मते मागत आहोत. 13 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत लोक उच्चांकिमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करीत आपल्याला मतदान करतील, असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विखे पिता-पुत्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यावर बोलताना खासदार विखे म्हणाले, "ज्या पक्षात कोणीच जायला तयार नाही, अशा पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे. प्रकाश आंबेडकर याबाबतीत कन्फ्युज असावेत. त्यांच्या या वक्तव्यावर जनता विश्वास ठेवणार नाही".

Lok Sabha Election 2024
Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorath) यांनी केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असता खासदार विखे म्हणाले, "थोरात आणि बीजेपीत येण्यासाठी कोणाच्या भेटी घेतल्या त्याआधी स्पष्ट करावं. आपण याविषयी आत्ताच बोलू इच्छित नाही. 5 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सभा घेऊन बीजेपीत येण्यासाठी कोणी कोणाशी केव्हा कधी संपर्क केला ते आपण सविस्तरपणे सांगू".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com