Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचा गावित हे सिटींग खासदार असूनही भाजपने ही जागा महायुतीत आपल्याकडे राखण्यात यश राखले. यामुळे राजेंद्र गावित यांचा पत्ता आपसकूकच कट झाले होते.
Rajendra Gavit In BJP
Rajendra Gavit In BJPsarkarnama

Palghar News : दिल्लीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थान पक्के करण्याची भाजप आणि मित्रपक्षांची धडपड सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील बंडाला साथ देत, दिल्लीत शिंदेचे संख्याबळ वाढवलेले खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. ठाकरेंना धोका देऊन अन् शिंदेंना भक्कम साथ देऊनही पालघरमधून तिकीट कापल्याने वैतागलेले गावित आता शिंदेंपासून लांब होऊन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Rajendra Gavit In BJP)

Rajendra Gavit In BJP
Lok Sabha Election 2024 : 'मुस्लिम समाजाला मस्ती आली असेल तर...'; शिवाजी कर्डिलेंचा हल्लेखोरांना इशारा...

ऐनवेळी लोकसभा निवडणुकीत दगाफटका शिंदेंकडून झाल्यानेच गावित हे स्वगृही अर्थात, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी, या लोकसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण करू पाहणाऱ्या शिंदेंकडचा पहिला खासदार फुटला आहे. गावितांच्या या पवित्र्यामुळे शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदारांना मोठा शॉक बसला, हे नक्की.

(राजकराणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे व्हाट्स अॅप चॅनेल फॉलो करा)

Rajendra Gavit In BJP
Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

पालघर शिंदेंनी राखले नाही -

पालघर लोकसभा मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने सुरुवातीपासून दावा केला होता. मात्र अंतिम क्षणी भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघात हेमंत सावरा यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे येथे शिवसेनेचा गावित हे सिटींग खासदार असूनही भाजपने ही जागा महायुतीत आपल्याकडे राखण्यात यश राखले. यामुळे राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांचा पत्ता आपसकूकच कट झाले होते.

Rajendra Gavit In BJP
Palghar Loksabha : नाराज राजेंद्र गावित युतीधर्म पाळणार? स्वतःच केला खुलासा

2019 मध्ये काय घडलं होतं?

मागील लोकसभामधील (Lok Sabha) अखंड शिवसेनेचेची उमेदवारी घेऊन राजेंद्र गावित यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव या दिग्गज उमेदवाराचा पराभव घडवून आणला होता. गावित यांना निवडणुकीत 5 लाख 80 हजार मते प्राप्त झाली होती. तर जाधव यांच्या पारड्यात 4 लाख 91 हजार मते पडली होती. सुमारे 1 लाख 90 हजार मताधिक्याने राजेंद्र गावित यांचा विजय झाला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेने पुकारलेल्या बंडानंतर गावित शिंदे सेनेत दाखल झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com