Jalgaon News : ...अन् शेतकरी संघटनेच्या जिल्ह्याध्यक्षांनी कांद्याची माळ घालून केलं मतदान, कारण काय?

Shetkari Sanghatna News : चोपडा तालुक्यातील वर्डी येथे संदीप पाटील ( Sandip Patil ) यांनी आई शोभाबाई पाटील यांच्यासह मतदान केलं.
sandeep patil voting wearing onion
sandeep patil voting wearing onionsarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 13 May : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. पण, लोकसभा निवडणुकीत कांदा, कापूस आणि शेतीमालावरील निर्यात बंदी हा मुद्दा चर्चेत राहिला. यातच शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी कापूस, कांदा यांच्यासह शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवण्यासाठी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केलं आहे.

चोपडा तालुक्यातील वर्डी येथे संदीप पाटील ( Sandip Patil ) यांनी आई शोभाबाई पाटील यांच्यासह मतदान केलं. यावेळी पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मोदी सरकार ( Modi Govt ) शेतकरी विरोधी आहे. राज्यात केलेल्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ही निर्यात बंदी कायम स्वरूपी उठवावी. त्यासाठी आपण कांद्याची माळ गळ्यात घालून मतदान केलं," असं संदीप पाटील यांनी सांगितलं.

नगरमध्येही कांद्याची माळ घालून बजावला मतदानाचा हक्क

उस्थळदुमाला (ता.नेवासे) येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिबंक भदगले यांनी गळ्यात कांद्याची माळ आणि एका हातात दुधाची बाटली घेऊन बुथ केंद्र क्रमांक 68 मध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला. गावातील मारुती मंदिर ते मतदान केंद्रापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसह फेरी काढली. ही अनोखी फेरी इतर मतदार व ग्रामस्थांत चांगलीच चर्चेची ठरली आहे.

एक महिन्यांपासून दुधाचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला त्यातच केंद्र सरकारने लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत कांदा निर्यातीस परवानगी देऊनही शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. त्यामुळे आपली संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भदगले यांनी गावातील मारुती मंदीराच्या ओट्यावर गळ्यात भलीमोठी कांद्याची माळ घालून व हातात दुधाची बाटली घेऊन 'मतदानाला चला तुम्ही मतदानाला चला,' असे म्हणत जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रापर्यंत फेरी काढली. ही अनोखी फेरी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

sandeep patil voting wearing onion
Lok Sabha Election News : मोठी बातमी! ...म्हणून संदिपान भुमरे, सुजय विखे अन् वसंत मोरेंचं स्वत:ला मतदान नाही

पोलिस यंत्रणा व मतदान प्रशासनाने भदगले यांना अडविले असता त्यांनी कांदा उष्णतारोधक असल्याने गळ्यात कांद्याची माळ घातल्याचे सांगितले. पाण्याची बाटली दुधापेक्षा महाग असल्याने तहान लागली तर पिण्यासाठी दुधाची बाटली बरोबर ठेवल्याचे सांगत अचारसंहितेचा कुठलाही नियम मोडला नसल्याचे सांगताच त्यांना मतदान करण्यास सोडण्यात आले.


( Edited By : Akshay Sabale )

sandeep patil voting wearing onion
Lok Sabha Election News : मोठी बातमी! ...म्हणून संदिपान भुमरे, सुजय विखे अन् वसंत मोरेंचं स्वत:ला मतदान नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com