Mahadev Jankar : जानकरांची गाडी सुसाट...; पंकजा मुंडेंना म्हणाले, भाजप कोणाचा पक्ष हे त्यांना समजलंय; तर भुजबळांसाठी 'हा' सल्ला

Mahadev Jankar, Chhagan Bhujbal, Pankaja Munde: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा सल्ला मंत्री भुजबळ ऐकणार का ?
Mahadev Jankar, Chhagan Bhujbal, Pankaja Munde
Mahadev Jankar, Chhagan Bhujbal, Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: "भाजप आणि काँग्रेसला ओबीसींचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे ओबीसी आज सैरभैर आहे. भुजबळ आणि मुंडे यांना हे आता कळू लागले आहे. बहिण मुंडे म्हणायची भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. परंतु तिला आता कळून चुकले आहे की भाजप कोणाचा पक्ष आहे ते! आता भुजबळ आणि मुंडे यांच्या हातात काहीच राहिले नाही. भुजबळ आणि मुंडे यांच्याकडे स्वतःचा पक्ष असता तर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली असती, ओबीसी समाज सैरभैर झाला नसता", असे मोठे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. (Mahadev Jankar On Chhagan Bhujbal and Pankaja Munde)

राष्ट्रीय समाज पक्षाची आज नगरमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून रवींद्र कोठारी यांना उमेदवारी यावेळी जाहीर करण्यात आली. याशिवाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar, Chhagan Bhujbal, Pankaja Munde
Karjat Nagar Panchayat : नगरसेवक अन् लेखाधिकारी महिला वादात ट्विस्ट; नामदेव राऊतांविरुद्धचा गुन्हा खोटा ?

जानकर म्हणाले, "राज्यातील ओबीसींची अवस्था ही सैरभैर अशी आहे. भाजप आणि काँग्रेसला ओबीसींचे काही देणे घेणे नाही. मुंडे आणि भुजबळ यांचे पक्ष असते तर ओबीसींची महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली असती. आज ओबीसी नेत्यांकडे पक्ष नसल्याने काय सोसावे लागते हे मुंडे आणि भुजबळ यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. भुजबळांना आवाहन आहे की तुम्ही स्वतःचा पक्ष काढा. मी कार्यकर्ता म्हणून काम करेल. माझ्या पक्षाची तुमच्या पक्षाबरोबर युती करून आपण महाराष्ट्रात सत्ता आणू, असेही महादेव जानकर म्हणाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्रात यावेळेस खासदार होणारच, असे सांगून भाजपने दोन जागा दिल्या तरच युतीचा विचार करू नाहीतर शरद पवार तीन जागा द्यायला तयार आहेत, असेही महादेव जानकर यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. यावेळी पक्षाचा लोकसभेत एक तरी खासदार असणार, असा विश्वास महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप चोवीस तास राजकीय मूडमध्ये आहे, असे सांगून काँग्रेसने देशमुखांच्या वाड्यावर जाऊन पक्ष संपवला, अशी टीका महादेव जानकर यांनी केली. भाजपने काँग्रेस सारखेच जातनिहाय जनगणनेला विरोध केला. काँग्रेसने ती चूक आता सुधारलेली आहे. परंतु भाजप आता जातनिहाय जनगणनेला विरोध करून चूक करत आहे, असेही महादेव जानकर म्हणाले.

माझ्याकडे अनेकजण तिकीट मागतात : जानकर

भाजपकडे आज ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आहेत. आमच्याकडे जनता आहे. भाजपला रोखायचे असेल, तर त्यांचा आमदार मत मागायला आल्यानंतर त्यांना प्रश्न करा. तुम्ही आमच्यासाठी काय केले ? भाजप आमदाराकडून त्याचे उत्तर मिळणार नाही, अशी मी खात्री देतो, असे सांगून आज माझ्याकडे अनेक जण तिकीट मागत आहेत, असा दावा जानकर यांनी केला.

भाऊसाहेब वाकचौरे माझ्या संपर्कात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांनी बोलून लोकसभेचे तिकीट देत असल्याचे सांगितले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे देखील माझ्या संपर्कात आहेत, असेही जानकर यावेळी म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahadev Jankar, Chhagan Bhujbal, Pankaja Munde
Chhagan Bhujbal news : ' ...त्यांनी थोडा गोळीबार करायला सांगितला होता!'; गृहमंत्री फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com