Lok Sabha Exit Poll 2024 : मुनगंटीवार लोकसभा उमेदवारीत अडकले, गिरीश महाजन निसटले!

Exit Poll Girish Mahajan BJP : राज्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील महायुतीच्या काही मंत्र्यांना लोकसभा निवडणूक मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Girish Mahajan sudhir mungantiwar
Girish Mahajan sudhir mungantiwarSarkarnama

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. त्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार पराभूत होणार असल्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले की ते लोकसभा निवडणूक तयार नव्हते. नेतृत्वाच्या आदेशाने ते त्यात अडकले पण मंत्री गिरीश महाजन हे मात्र लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून बाहेर पडून वाचले आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील महायुतीच्या काही मंत्र्यांना लोकसभा निवडणूक मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis,अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन,विधानसभा सभापती राहुल नार्वेकर अशा अनेक नावांची चर्चा होती. कालांतराने अनेक कारणांमुळे निवडणुकीच्या मैदानातून एक एक नाव कमी झाले. शेवटी राज्यातील भाजपचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी लागली.

राज्यातील भाजपचे मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांनाही रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत होते. पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारून मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्याची केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. त्या दृष्टीने तयारी सुरू होती.

जर भाजपने रक्षा खडसे यांची उमेदवारी नाकारली तर एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीस तयार होते. त्यामुळे गिरिश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे अशी लढतीची चर्चा सुरू झाली होती. मात्र रावेर मतदारसंघाचा विचार केल्यास या ठिकाणी जातीनिहाय गणिताचा विचार केला जातो. अशा स्थितीत गिरीश महाजन याना यशाची आशा धूसर होती. परंतु जर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास निवडणूक लढवावी लागणार होती.मात्र पक्षाचे तसेच सरकारचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन स्वतः संकट टाळण्यासाठी समर्थ नसले तर नवलच.

लोकसभा उमेदवारी जाहीर होण्याच्या काळात त्यांनी कोठेही काहीही वक्तव्य केले नाही. स्वतःच्या उमेदवारीबाबत तर नाहीच नाही. उमेदवारी जाहीर करण्याअगोदर केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जळगावात जाहीर सभा झाली. या सभेचे नियोजन त्यांनी केले तसेच आपल्या जी. एम. फाउंडेशन जागेत भाजपचे नवीन कार्यालय बांधून त्याचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते केले. त्यानंतर भाजप तर्फे राज्यातील उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.

त्या यादीत रावेर मतदार संघातून खासदार रक्षा खडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे गिरीश महाजन मात्र लोकसभा निवडणूक लढविण्याच्या कसोटीतून सुटले. मात्र त्यांनी खान्देशातील चारही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात एक्झिट पोलमध्ये खान्देशामध्ये भाजपला यश येत असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By Roshan More)

Girish Mahajan sudhir mungantiwar
Lok Sabha Election Exit Poll : एक्झिट पोलचे आकडे मॅनेज केले', काँग्रेस नेत्याचा मोदींवर गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com