Loksabha Election 2024 : भाजपच्या निरीक्षकांची चिडचिड अन् कार्यालयात पोहोचण्यास विलंब! नक्की काय घडलं?

Raver Loksabha Constituency : भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांनी काल रावेर मतदारसंघात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत मते जाणून घेतली. त्यांच्या गोपनीय अहवालानंतर उमेदवारीचा निर्णय होणार आहे.
Hansraj Ahir, Raksha Khadse, Sanjay Kute
Hansraj Ahir, Raksha Khadse, Sanjay KuteSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon BJP Politics News :

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात भाजपच्या निरीक्षकांनी काल (29 फेब्रुवारी) रावेर मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पक्षाच्या तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची वन-टू-वन चर्चा केली. या चर्चेतून उमेदवारीबाबतचा कल जाणून घेतला. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि आमदार संजय कुटे हे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे निरीक्षक आहेत. या निरीक्षकांनी त्यांचा दौरा गोपनीय ठेवला होता. त्यामुळे वेगळाच गोंधळ झाला.

Hansraj Ahir, Raksha Khadse, Sanjay Kute
Loksabha Election 2024 : भाजप म्हणते, "नाशिक मतदारसंघ आमचाच"

हंसराज अहिर (Hansraj Ahir) आणि आमदार संजय कुटे (Sanjay Kute) एकच वाहनाने भुसावळला आले होते. त्यावेळी त्यांना आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात जायचे होते. याच ठिकाणी ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांची उमेदवारीबाबत मते जाणून घेणार होते. मात्र ते शहरात नवीन असल्याने त्यांना आमदार सावकारी यांचे कार्यालय शोधण्यात बराच वेळ गेला. अनेकदा ते रस्ता चुकले. त्यामुळे कार्यालयात येण्यास त्यांना बराच विलंब झाला.

या सगळ्यांचा मनस्ताप झाल्याने आमदार सावकारे यांच्या कार्यालयात पोहोचल्यावर अहिर यांची खूप चिडचिड झाली. त्यांनी कोणाशीही चर्चा न करता तसेच सत्कार न स्वीकारताच थेट कार्यकर्त्यांशी वन-टू-वन चर्चा सुरू केली. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

भाजपच्या (BJP) निरीक्षकांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात (Loksabha Election) तसेच उमेदवारीबाबत प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी एक ते दीड मिनिटे व्यक्तिशः चर्चा केली. सुमारे तीन तास या मुलाखती आणि चर्चा सुरू होत्या. यावेळी खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse), माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह अन्य इच्छूक उपस्थित होते. निरीक्षकांनी या इच्छुकांचीही चर्चा केली. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघाची (Raver Loksabha Constituency) सध्याची राजकीय परिस्थिती त्यांनी समजून घेतली. त्यानंतर ते निघून गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेळी भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळेल, असा दावा केला. सध्याच्या परिस्थितीत महायुती समोर विरोधकांकडे प्रबळ उमेदवार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षांना निरीक्षकांनी विरोधी पक्षांचे स्थिती आणि संभाव्य उमेदवार याबाबत देखील विचारणा केली. मात्र खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत विचारल्यावर त्यांनी ही बाब गोपनीय असल्याचे सांगत उत्तर देणे टाळले. त्यामुळे खासदार खडसे यांच्या उमेदवारीचा फैसला आता निरीक्षकांच्या गुप्त अहवालावर ठरणार आहे.

(Edited by Avinash Chandane)

Hansraj Ahir, Raksha Khadse, Sanjay Kute
Maratha Reservation News : भाजपचे बाहुले बनलेले 'ते' चार नेते कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com