Political News : ‘अच्छे दिन आने वाले है’ पासून सुरू झालेल्या भाजपचा राजकीय प्रवास गत निवडणुकीत ‘सबके साथ, सबका विकास’ यावर आला. यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मोदी की गॅरंटी’ या टॅगलाईनला पुढे आणले आहे. कमीत कमी शब्द आणि सहज नागरिकांच्या तोंडावर रूळतील अशा या टॅगलाईन विरोधकांच्या प्रचाराला पुरून उरतात.
या टॅगलाईनमधून निर्माण होणाऱ्या वातावरणाला भेदणे विरोधकांना दोन टर्म शक्य झाले नाही. यावेळी ‘मोदी की गॅरंटी’ या टॅगलाईनला मात्र महागाई, पडलेले शेतमालाचे भाव यांचे आव्हान विरोधक उभे करतील असे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2010 नंतर भाजपला(BJP) यश मिळाले त्यात मोदी नावाचा फॅक्टर नक्कीच आहे. मात्र, मोदींना लोकसभेत जोडीला येतात त्या भाजपाच्या जाहिराती. कॅची टॅगलाईनचा प्रसार प्रचार इतका होतो की प्रत्येकाच्या तोंडावर त्या टॅगलाईन सहजतेने रूळतात. 2014 मध्ये भाजपने अच्छे दिन आने वाले है, या टॅगलाईनचा वापर केला होता. 2018मध्ये सबके साथ सबका विकास ही टॅगलाईन वापरण्यात आली. आता मोदी की गॅरंटी हा शब्द वापरून मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. मात्र यावेळी शेतमालाच्या पडलेले आणि वाढलेली महागाईसमोर मोदी की गॅरंटी या शब्दाची जादू चालेल की नाही, अशी चर्चा आहे.
याबाबत बोलताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संपर्कप्रमुख दिंडे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना सोयाबीनचा भाव सात हजार पन्नास होता. आता तोच भाव चार हजाराच्या घरात पोहचला आहे. त्यावेळी कपाशीला दहा हजार रूपयांचा मिळायचा. आता सहा हजार रूपये सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात पडत नाही. पेट्रोल कंपन्यांना हजारो कोटींचा फायदा होत असताना पेट्रोलचे दर मात्र कमी होत नाही.
आमच्याकडे गॅरंटी या शब्दला अनेक पर्याय आहेत. जुम्ले तयार करून सत्ता काबीज करण्याचे भाजपचे दिवस भरले आहेत. कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांना उद्धवस्त केले. शेतकऱ्यांना संपवणे हीच मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोदींची गॅरंटी हीच भाजपवर बुमरँग होईल, असेही दिंडे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.