Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीसाठी शरद पवार गटातून गावित अन् भगरेंमध्ये रस्सीखेच; सर्व्हेअंती होणार निवड!

Chintamani Gavit and Bhaskar Bhagre : 3 मार्च रोजी शरद पवार शेतकरी मेळाव्याला हजर राहणार असून, त्याच्या आतच चित्र स्पष्ट होणार
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Nashik Loksabha Election 2024 News : महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्ष दिंडोरी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार यात आता शंका उरलेली नाही. या ठिकाणी पक्षाकडून चिंतामणी गावित आणि भास्कर भगरे यांच्यापैकी एकाची निवड होईल, असे बोलले जात आहे. यात जातीचा फॅक्टर महत्वाचा असला तरी भाजपाकडून येणाऱ्या संभाव्य उमेदवाराच्या नावांमध्ये कोण आघाडी घेऊ शकतो, हे सुद्धा पक्षाकडून तपासले जाते आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शेतकरी बहुल असून, कांदा निर्यातबंदी आणि द्राक्ष निर्यातीला अनुदानापासून वंचित ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांवर शेतकरी नाराज आहेत. याचा सर्वात मोठा फटका केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार(Bharti Pawar) यांच्यासह भाजपाला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीची तयारी सुरू आहे. 13 मार्च रोजी शरद पवार शेतकरी मेळाव्याला हजर राहणार असून, त्याच्या आतच भगरे की गावित हे स्पष्ट होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नऊ तालुके आणि सहा विधानसभा मतदार संघातील बसवंत पिंपळगाव येथील भास्कर भगरे हे कोळी समाजाचे असून, शरद पवार(Sharad Pawar) यांच्याशी एकनिष्ठ असलेले भगरे यांनी जिल्हा परिषदेसाठी नेतृत्व केले आहे. चिंतामणी गावित हे सुद्धा आदिवासींच्या मुलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या सुरगणा तालुका संघर्ष सीमा समितीने सुरगाणा तालुक्यातील काही गावे थेट गुजरात राज्याला जोडून देण्याची मागणी 2022 मध्ये केली होती.

गावित आणि भगरे यांच्यापैकी एकाची निवड शरद पवार करू शकतात. पक्षाकडे असलेल्या सर्वच इच्छुकांपैकी दोघांची नावे पदाधिकाऱ्यांनी अंतिम केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दोघांच्या नावासाठी सर्व्हे सुरू केला आहे. भाजपाकडून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि भाजपाचे पदाधिकारी एन. डी. गावित यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

त्यानुसार या दोघांपैकी एकाची निवड झाल्यास गावित आणि भगरे यांच्यापैकी कोणाचे पारडे जड भरणार याचा शोध सर्व्हेच्या माध्यमातून घेतला जातो आहे. आगामी दोन दिवसात हा सर्व्हे पूर्ण होईल. यानंतर शरद पवार आपला निर्णय घेतली, असे सूत्रांकडून समजते.

शरद पवार 13 तारखेला शेतकरी मेळाव्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार असून, निफाड तालुक्यात आयोजीत होणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या पक्षाकडून सुरू आहे. या मेळाव्यात शरद पवार दिंडोरी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडतील. केंद्रीयमंत्री डॉ. पवार या कोकणा समाजाच्या आहेत. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही भारती पवारांनी बाजी मारली.

तर, अडीच वर्षांपूर्वी भाजपाने केंद्रीय राज्यमंत्री पदाची माळ पवार यांच्या गळ्यात घालून कोकणा समाजाची 75 वर्षांपासूनची मंत्रिपदाची मागणी पूर्ण केली. मात्र, आता भारती पवार यांना उमेदवार मिळणार की नाही, याची शाश्वती नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com