Raver Loksabha News: रावेर लोकसभेत शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरींचा बंडखोरीचा इशारा

Loksabha Election 2024 : 'चार पक्षांचे मला बोलावणे आहे. शिवाय त्या पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार आहे...'
Santosh Chaudhary
Santosh ChaudharySarkarnama

Jalgaon News : मच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाने अनेकवेळा अन्यायच केला तरीही माझ्या हृदयात शरद पवारांचे स्थान कायम आहे. अजूनही उमेदवारी बदलवली जाण्याची मला अपेक्षा असून पक्ष आपल्याला उमेदवारी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

अन्यथा येत्या 24 तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत, अशी घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात केली आहे. त्यामुळ रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात तिढा निर्माण झाला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी श्रीराम पाटील यांना जाहीर करण्यात आली आहे.त्यांचा सामना भारतीय जनता पक्षाच्या खासदार व एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याशी आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवारीसाठी अद्यापही इच्छुक आहोत, पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत असा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता. तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Santosh Chaudhary
Raigad Pattern : उमेदवारांसाठी सर्वाधिक डोकेदुखीचा 'रायगड पॅटर्न'

चौधरी म्हणाले, खरंतर 2009 मध्येच माझी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा होती मात्र षडयंत्र रचून मला अडचणीत आणले गेले. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, राज्यात मंत्रिपद अशा संधी जाणूनबुजून डावलण्यात आल्या. चौधरी परिवाराचा पक्षाने फक्त वापर करून घेतला. पंधरा वर्षात आमच्या परिवाराने खून भोगले आहे. पक्षाकडून न्याय मिळालेला नाही. आता तर लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नव्हती. पण शरद पवारसाहेबांनीच (Sharad Pawar) मला याबाबत विचारणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.

रविंद्रभैय्या पाटील व मी अशी दोनच नावे होती. नंतर इतर नावे समाविष्ट होत गेली. शेवटी श्रीराम पाटील पक्षात नसताना त्यांचे नाव घोषित झाले हे पहिल्यांदाच पक्षात घडले. मी उद्या मुंबईनंतर दिल्ली येथे जाईल,काय घडामोडी होतील आपण पाहणार आहोत. मात्र, पक्षाचे नेते शरद पवारला मुक्ताईनगरला येत आहेत तेथील जाहीर सभेत उमेदवारी बदलाची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. कारण या आधी दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी भुसावळ विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या सभेतच शिवसेनेना उमेदवार बदलविला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला चार पक्षाची ऑफर

आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत संतोष चौधरी म्हणाले, चार पक्षांचे मला बोलावणे आहे. शिवाय त्या पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारीचा ए. बी. फॉर्मवर माझीच सही असेल. येत्या 24 तारखेला मी रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Santosh Chaudhary
Lok Sabha Election 2024: निवडणुकीची घोषणा होऊन महिना उलटला तरी 12 जागांचा 'जुगाड' काही केल्या जुळेना !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com