Sharad Pawar News : सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले, 'त्या' वक्तव्यावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Baramati Loksabha :सुनेत्रा पवार यांना या संबंधी प्रश्न विचारल्यानंतर त्या भावूक झाल्या होत्या. विरोधी पक्षाकडूनदेखील शरद पवारांवर निशाना साधला जात होता.
Ajit Pawar Sharad Pawar Sunetra pawar
Ajit Pawar Sharad Pawar Sunetra pawarsarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : बारामती मतदारसंघात अजित पवारांनी Ajit Pawar केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी 'मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार' तपासून घ्यावे लागेल, असे म्हटले होते. यावरून शरद पवारांवर टीका करण्यात येत होती. सुनेत्रा पवार यांना या संबंधी प्रश्न विचारल्यानंतर त्या भावूक झाल्या होत्या. विरोधी पक्षाकडूनदेखील शरद पवारांवर निशाना साधला जात होता. अखेर शरद पवार यांनी त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar Sharad Pawar Sunetra pawar
Supriya Sule News : 'नटसम्राट की कार्यसम्राट?' अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....

'मी तसं बोललो नव्हतो. अजित पवारांना भाषण दिलं होतं. त्यात ते म्हणाले, मला (अजित पवार) निवडून दिलं. ताईंना (supriya sule) निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. पुढे त्यांनी काही वाक्य वापरलं. त्या संबंधी मी फक्त स्पष्टकरण केलं. त्यापेक्षा वेगळं काही मला सांगण्याचे कारण नव्हतं. महिलांच्या हितासंबंधी हिश्शू असेल तर या देशात महिला आरक्षणा संदर्भात महिला निर्णय मी घेणार मी पहिला मुख्यमंत्री होतो, असे शरद पवार (Sharad Pawar)म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'शासकीय सेवेत महिलांना विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलात मुलींना सहभागी करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. महिलांना सन्मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी निर्णय आम्ही घेतले, असेसुद्धा शरद पवार यांनी सांगितले. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारवर टीका केली.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार

पहिल्यापासून आपण पवारांना साथ दिली. आता काय करायचे असा बाका प्रसंग बारामतीकरांपुढे उभा आहे. तुम्ही फक्त पवार आडनाव असेल तेच बटण दाबा, म्हणजे पवारांमागे उभे राहण्याची परंपरा खंडित होणार नाही. तुम्ही 1991 लेकाला म्हणजे मला खासदार केले. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. नंतर लेकीला म्हणजे सुप्रिया सुळेंना तीन वेळा साथ दिली. आता सुनेला निवडून द्या. त्यामुळे वडील खूष, कन्या खूष, लेक खूष, सूनही खूष आणि बारामतीकरही खूष!

R

Ajit Pawar Sharad Pawar Sunetra pawar
Ajit Pawar Vs Mohite Patil : "मोहिते-पाटील स्वार्थी अन् मतलबी," अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com