Nashik Loksabha Election News : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे त्यांनी प्रचार सुरू केला आहे. मात्र, आता उमेदवारीसाठी इतरही दावेदार पुढे येत आहेत. त्यामुळे निवडणुकीअगोदरच शिंदे गटात उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये ओढाताण सुरू आहे. यामध्ये आता शिंदे गटात इच्छुकांची भर पडली आहे. एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेचे सिडको भागातील सर्व परिचित नेते मामा ठाकरे यांच्या समर्थकांनी यामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ठाकरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांची भेट घेईल. ठाकरे यांचा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये संपर्क आहे. त्यामुळे ते एक प्रबळ उमेदवार ठरतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मामा ठाकरे हे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. त्यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली आहे. सिडको भागात राजे संभाजी स्टेडियम, श्री स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, ठाकरे सभागृह अशी मोठी विकासकामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी ते प्रमुख दावेदार असतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला.
बाळ भाटिया, आबासाहेब सोनवणे, सुभाष बागड यांसह विविध समर्थक ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. एकंदरच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात लोकसभेची चर्चा जोर धरण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुती अतिशय सक्रिय झालेली दिसते. भाजपाने हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा असे प्रयत्न देखील सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने देखील विद्यमान खासदार म्हणून हा मतदारसंघ शिंदे गटालाच मिळेल असे म्हणत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट आश्वासन दिलेले होते, त्याचे पालन करणे युतीचा धर्म आहे असा दावा केला आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि शिंदे गट यांच्यात मतदारसंघ मिळवण्यासाठी असलेली स्पर्धा आता उमेदवारांची उमेदवारी मिळविण्यासाठी देखील निर्माण झाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.