घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅस पोचवणार!

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली यांच्याकडून गॅस प्रकल्पाचा आढावा घेतला.
Rameshwar Teli
Rameshwar TeliSarkarnama
Published on
Updated on

Nitinसातपूर : खर्चाची बचत व प्रदूषण (Polluation) कमी करण्यासाठी सीएनजी, (CNG) इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर करण्याबाबत धोरण राबवले जात आहे. घराघरांत पाइपलाइनद्वारे गॅस (GAS) पोचविण्यासाठी प्रयत्न आहे. आज नाशिकमधील (Nashik) गॅस पाइपलाइन प्रकल्पाचाही आढावा घेतला आहे. युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असे केंद्रीय पेट्रोलियम व कामगार मंत्री (Center petrolium minister) रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी सांगितले. (Now Nashik will get LPG through pipeline)

Rameshwar Teli
Maharashtra-Karnataka Border Dispute : मुख्यमंत्री बोम्मई दिल्लीत दाखल; मुकुल रोहतगींशी चर्चा करणार

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशात ८७ टक्के तेल व ५० टक्के गॅस बाहेर देशातून आयात करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. तो खर्च वाचविण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

Rameshwar Teli
Nitin Gadkari : रोडकरी नंतर आता नितीन गडकरी झाले स्पायडरमॅन !

मंत्री श्री. तेली यांनी हॉटेल ताजमध्ये पेट्रोल- डिझेल वितरणासह सीएनजी व घरगुती गॅस पाइपलाइन प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी पेट्रोलमध्ये या पूर्वी दहा टक्के इथेनॉलचा वापर केला जात होता, आता तो वीस टक्यांवर नेण्याचा प्रयत्न असून साखर कारखाने, धान्य, बांबू व इतर माध्यमातून इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यासाठी केंद्राने धोरणात्मक निर्णय घेतला असून येणाऱ्या काळात याचा चांगला परिणाम दिसेल, असे मंत्री तेली यांनी सांगितले.

नाशिक शहरात घराघरांत पाइपलाइनद्वारे गॅस पोचविण्यासाठी प्रयत्न आहे, त्या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आहे. त्या कामाला गती देण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच पहिल्या टप्प्यातील हा प्रकल्प पूर्ण झाला तर दुसऱ्या टप्प्यातील काम ही सुरू होईल, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com