नाशिक : स्मार्टसिटी कंपनीमार्फत (Smart city componey) माहिती व तंत्रज्ञानासंदर्भात करावयाची कामे ‘महा-आयटी’ या राज्य शासनाच्या कंपनीमार्फत करण्याचे बंधन घातल्यानंतर शहरात सीसीटीव्ही बसविण्यापासून ते कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करण्यापर्यंत कामे अपूर्ण असताना आता पुन्हा नव्याने ५५ कोटी रुपयांची मागणी महा-आयटी कंपनीकडून स्मार्टसिटी कंपनीकडे करण्यात आली आहे. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आरोपानंतर चर्चेत आलेल्या महा-आयटीच्या संथ कामामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
स्मार्टसिटी कंपनीकडून १८९ कोटींची माहिती तंत्रज्ञान संदर्भातील कामे हाती घेण्यात आली होती. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्मार्ट सिटी कंपन्यांमार्फत सुरू आयटी संदर्भातील कामे राज्य शासनाच्या महाआयटी कंपनीमार्फतच करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक स्मार्टसिटीची कामे आपोआप महाआयटीकडे वर्ग झाली.
नाशिकमध्ये जवळपास आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व स्मार्टसिटी कंपनी व पोलिस आयुक्त कार्यालयात कमांड कंट्रोल सेंटर उभारण्याचे प्रस्तावित होते. पोलिस आयुक्त कार्यालयातील सेंटरचे काम अपूर्ण आहे तर स्मार्टसिटी कार्यालयात कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित झाले असले तरी सिग्नलवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त जोडले गेले आहेत.
अद्याप शहराच्या मुख्य रस्त्यांवर कॅमेरे बसले गेले नाहीत. यापूर्वी ४५ कोटी रुपये महा- आयटीला अदा केले आहे. मागील महिन्यात कंपनीकडे ५५ कोटींची मागणी करण्यात आली. काम अपूर्ण असताना महाआयटी कंपनीने पैशांसाठी तगादा लावल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महा- आयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या केलेल्या आरोपामुळे स्मार्टसिटी कंपनीकडे मागण्यात आलेले ५५ कोटी रुपये पुन्हा चर्चेत आले आहे.
तीन सिग्नलवर कॅमेरे
स्मार्ट रस्त्यावरील मेहेर सिग्नल, सीबीएस, त्र्यंबक नाका वगळता एकाही सिग्नलवर सीसीटीव्ही बसविले गेले नाही. कॅमेरे बसविण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. ५२६ कॅमेरे पोलिसांसाठी, तर २७४ कॅमेरे महापालिका सुविधांसाठी वापरणार आहे. सर्व कॅमेरे कमांड कंट्रोल सेंटरला जोडले जाणार आहे. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीत निधी देण्यावर निर्णय घेतला जाईल. मात्र, महा- आयटी संदर्भातील अनेक कामे शिल्लक असल्याची माहिती स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.