Mahakumbh Mela : धक्कादायक, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे हे आहे कारण...

Mahakumbh Mela; police close road is reason for stampede?-प्रयागराज येथील कुंभमेळ्यात तिसऱ्या आणि महत्त्वाच्या मौनी अमावस्येच्या शाही स्नानाला गालबोट लागले
Mahakumbh-Stampede
Mahakumbh-StampedeSarkarnama
Published on
Updated on

Mahakumbh Mela news: महा कुंभमेळ्याचे तिसरे आणि महत्त्वाचे स्नान आज होते. त्याला मोठे गालबोट लागले आहे. गर्दी नियंत्रणा बाहेर गेल्याने येथे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक भाविकांच्या मृत्यूची भीती व्यक्त होत आहे.

आज पहाटे प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात तिसरे शाही स्नान होते. मौनी अमावस्या निमित्त होणारे हे शाही स्नान सर्वात महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे लाखो भाविकांची येथे गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रणा बाहेर गेली. सुमारे साडे चार कोटी भाविकांचे स्नान होईल, असा प्रशासनाचा अंदाज होता.

Mahakumbh-Stampede
Shivsena Politics : दानवेसाहेब, तुम्हीही चला आमच्यासोबत शिंदेसाहेंबाच्या शिवसेनेत! 'नगरी' शिवसैनिकांसमोर ठाकरेंच्या शिलेदाराची बोलती बंद

महाकुंभमेळ्यात नाशिक येथील विविध आखाड्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. नाशिकहून मोठ्या संख्येने भाविक देखील या कुंभमेळ्याला हजर आहेत. या प्रत्यक्षदर्शिनी चेंगराचेंगरीची विविध कारणे सांगितली आहेत.

Mahakumbh-Stampede
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटेंची कोपरखळी....तर माझेही फ्लेक्स लावा!

आज पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते ही दुर्घटना घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे २४ तास आधीच कुंभमेळ्यातील बहुतांशी सेक्टर बंद करण्यात आले होते. सर्वप्रमुख रस्ते बंद असल्याने सेक्टर ११ ते १७ दरम्यान लाखो भाविकांची गर्दी जमली होती.

या गर्दीला बाहेर पडण्यासाठी पुरेसा व योग्य मार्ग उपलब्ध नव्हता. त्यांना बाहेर कसे पडावे याचीही माहिती देण्यात येत नव्हती. यापूर्वी देखील काल सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगमावर फेरफटका मारला असता, बाहेर पडण्यासाठी वीस ते एकवीस किलोमीटर पायपीट करूनही रस्ता सापडत नव्हता.

सर्व रस्ते बंद असल्याने अनेक भाविक त्याच त्याच जागी फिरून येत होते. पोलिसांकडून याबाबत कठोर नियंत्रण ठेवण्यात आले होते. या संदर्भात नेमकी माहिती देण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार या ठिकाणी उपस्थित असलेल्या नाशिकच्या भाविकांनी दिली आहे.

मौनी अमावस्या हा प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा मुख्य स्नान योग असतो. हा कुंभमेळ्याचा मध्यबिंदू म्हणून देखील मानला जातो. प्रत्येक कुंभमेळ्यात तिसरे शाही स्नान सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे आखाड्यांच्या शाही स्नानाआधी संगमाचा परिसर बंद केला जातो. परंपरेने ठरलेल्या क्रमाने आखाडा आणि अनी स्नान करतात.

शाही स्नानानंतरच भाविकांना संगमावर स्नान करण्याची परवानगी दिली जाते. या परवानगीच्या प्रतीक्षेत लाखो भाविक अडकून पडले होते. या गर्दीमुळेच कोंडी होऊन चंद्राचेंगरीची दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

महा कुंभमेळ्यातील प्रयागराज येथे संगमाच्या परिसरात साधू ग्राम उभारण्यात आले आहे. या साधू ग्राममध्ये २१ सेक्टर करण्यात आले आहेत. या २१ सेक्टर पैकी १९ सेक्टर प्रत्येक शाही स्नानाआधी २४ तास बंद केले जातात. कालही पोलिसांनी शाही स्नान सुरळीत पार पाडावे यासाठी हे सेक्टर बंद केले होते.

त्यामुळे भाविकांना संगमाच्या दोन ते तीन किलोमीटर अलीकडे रोखले जात होते. तेथेच त्यांचे स्नान सुरू होते. येथून बाहेर पडताना नेमके बाहेर कुठून पडावे याची योग्य माहिती न मिळाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com