Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटेंची कोपरखळी....तर माझेही फ्लेक्स लावा!

Manikra Kokate;Agriculture Minister Kokate also made a joke about Girish Mahajan's flex -नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा राजकीय तिढा अद्याप सुटण्याची चिन्हे नाहीत
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikra Kokate News: नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती केव्हा उठणार याची कार्यकर्ते विचारणा करीत आहेत. कोण पालकमंत्री होणार? याबाबत दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे.

पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गिरीश महाजन हेच पालकमंत्री होणार, याबाबत आत्मविश्वास आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

Manikrao Kokate
Hemlata Patil : डॉ. हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश होता होता राहिला...काय घडले कारण!

मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ठीक ठिकाणी त्यांचे होर्डिंग लावले आहेत. या सर्व होर्डिंग्सवर पालकमंत्री म्हणून मंत्री महाजन यांचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला देखील श्री. महाजन हेच प्रमुख पाहुणे होते.

Manikrao Kokate
Girish Mahajan : गिरीश महाजन शिवसेना नेते संजय राऊत यांना म्हणाले...

या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्या समर्थक मात्र अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी कोकाटे यांच्याकडे भाजपकडून लावण्यात आलेल्या फ्लेक्स बाबत आपली नापसंती व्यक्त केली. पालकमंत्री केव्हा आणि कोण होणार असे विचारणे हे कार्यकर्ते सतत करत होते.

यावर मंत्री कोकाटे यांनी देखील नामी शक्कल शोधली आहे. गिरीश महाजन यांचे पालकमंत्री म्हणून फ्लेक्स लावल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटत असेल. त्यांचे समर्थक खुश होत असतील तर होऊ द्या. माझे फ्लेक्स लावल्याने तुम्हाला आनंद मिळणार असेल तर, माझेही लावा असा चिमटा त्यांनी आपल्या समर्थकांना घेतला आहे.

कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे स्थानिक मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्यात यावे यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यासाठी कोकाटे समर्थकांनी आंदोलन देखील केले होते.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व चौदा आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिक नाही. त्यामुळे आमदार देखील अस्वस्थ आहेत. स्थानिक मंत्र्यांना पालकमंत्री करावे, यासाठी त्यांचा आग्रह आहे. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com