
Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या मुद्यावर मोठा शब्दप्रयोग करत भाजपला फटकारले आहे.
'माझी सत्ता पाडणे हा 'सत्ता जिहाद' होता', असा खणखणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुंबईतील उद्योग अहमदाबादला घेऊन जाऊन महाराष्ट्रापासून मुंबई तोडली जात आहे. यातून लव जिहाद, हिंदुत्व, असे मुद्दे पुढे केले जात आहेत. पण आता हे मुद्दे मागे पडले असून, भाजप महायुती सत्ताधाऱ्यांनी सोयाबीन, कांदा, दूध, शिक्षण अशा मुलभूत प्रश्नांवर बोलावं, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपने (BJP) हिंदुत्वाकडे नेली आहे. बटेंगे तो कटेंगे, असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभांमधून देत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'सकाळ माध्यम समहू'च्या साम टीव्ही वृत्तवाहिनीवर 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या सदराखाली मुलाखत दिली. या मुलाखतीच्या सुरवातीलाच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाडले. हा सत्ता जिहाद होता, असा खणखणीत टोला लगावला. 'माझी सत्ता पाडणे हा भाजपचा 'सत्ता जिहाद' होता', असा खणखणीत आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महाराष्ट्र, मुंबईचा आत्मविश्वास तोडला जातोय
उद्धव ठाकरे म्हणाले, "'मविआ'ची, म्हणजेच माझी सत्ता पाडण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ होते. हे पाठबळ महाराष्ट्र लुटण्यासाठी होते. मुंबईतील उद्योग अहमदाबादला नेले जात आहेत. यातून महाराष्ट्र, मुंबईचा आत्मविश्वास तोडला जात आहे. पण मी तसं होऊ देणार नाही". मुख्यमंत्री असताना मी महाराष्ट्रात साडेसहा लाख कोटींचे उद्योगाचे सामंजस्य करार केले होते. हे सर्व उद्योग मुंबईतून अहमदाबादला नेले जात आहे. मुंबईतून रोजगार नेले जात आहे. देशाचे आर्थिक केंद्र गुजरातच्या अहमदाबाद करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घातला असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपचे या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावरून बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आहे. तसेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहाद, असे मुद्दे आणले आहेत. या मुद्यांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "हे मुद्यांमुळे सोयाबीन, कांदा, पीक भावांचा प्रश्न सुटणार आहे का? असा टोला लगावला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. पुतळा पडला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांचा अपमान केला, हे विसरलो नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दैवताचा स्वाभिमानासाठी संपूर्ण राज्यात मंदिर बांधणार असून, हे गद्दार जिथे पळून गेले होते, तिथे सुरतला देखील मंदिर उभाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.