Uddhav Thackeray : महिलांचा अपमान करणाऱ्या आमदाराच्या प्रचारासाठी PM मोदी आले; उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरून सुनावले... पाहा VIDEO

ShivSena chief Uddhav Thackeray PM Narendra Modi CM Eknath Shinde Abdul Sattar Nashik Sillod : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली.
Uddhav Thackeray 3
Uddhav Thackeray 3Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सिल्लोड इथल्या सभेत आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.

"अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंचा अपमान केला होता. आणि याच आमदाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सिल्लोडमध्ये होते. हेच का तुमचे हिंदुत्व?, हीच का तुमची संस्कृती?", असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेत जोरदार टीका केली. तसंच महिलांचा अपमान करणाऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्याने त्यांनाही चांगलेच सुनावले.

Uddhav Thackeray 3
Rohit Pawar : भाजप नेत्यांची भाषा घसरली, आमदार पवारांनी टायमिंग साधलं अन् VIDEO शेअर केला

अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) अपमान केला होता. त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी महिलांचा अपमान करणाऱ्या आमदारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभे घेतली. हेच का यांचे हिंदुत्व? हिच का यांची संस्कृती? कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी प्रज्वल रेवन्ना याचा प्रचार केला. हा प्रज्वल रेवन्ना कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. याचे हात बळकट करा, असे म्हणणारे पंतप्रधान यांचे हे हिंदुत्व मान्य आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray 3
Madha Politic's : माढ्यात उलटफेर, 'काकांच्या भूमिकेशी संपूर्ण सावंत परिवार सहमत नाही'; अनिल सावंतांनी भूमिका केली स्पष्ट

सोयाबीनला हमीभावाचे वचन

शेती मालाला भाव नाही. गद्दारांना भाव मिळत आहे. यातून गद्दार मस्तीत आहेत. गद्दारांना पन्नास खोके मिळत असतील, तर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे का मिळू नये. निवडून दिला तो गद्दार झाला. खोके घेऊन पळाला. ज्याने निवडून दिला, तो त्यांच्याकडे गेल्यानंतर दादागिरी करतो, असे सांगून मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवले, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही. परंतु मिंधेंना भाव मिळतो. आता मी सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव देणार असल्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले.

महिलांच्या सुरक्षितेसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे

उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफीची आठवण करून दिली. यांनी गद्दारी करून सरकार पाडले नसते, तर पुन्हा कर्जमाफी दिली असती. मी म्हणजे, मिंधे नाही. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत आहे. ही पैसे मिंधे वडिलांच्या घरातून आणत नाही. हे माझ्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत. या माझ्या भगिनींना मी तीन हजार रुपये देणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी राज्यात स्वतंत्र पोलिस ठाणे बांधणार आहे, असे अश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com