Ministers absent : विधान परिषद तहकुबीची नामुष्की

विरोधी सदस्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर आक्रमक भूमिका घेतली.
Nilamtai Gorhe
Nilamtai GorheSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : (Mumbai) अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु असतांना आज विधानपरिषदेच्या (Maharashtra Council) सभागृहात जबाबदार मंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधी बाकावरील सभासदांनी सभागृह तहकुबीची मागणी लाऊन धरली. त्यामुळे सभागृहातील कामकाज तहकुब करण्याची नामुष्की ओढवली. (No Responsible minister present during Last week praposal discussion in Council)

Nilamtai Gorhe
Dhule Loksabha; शिवसेनेच्या मतांची वजावट हीच भाजपची डोकेदुखी!

आज तालीका सभपती नरेंद्र दराडे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना परवानगी दिली होती. यावेळी सत्ताधारी बाकावर एकही सदस्य नव्हता. जबाबदार मंत्री नसल्याने विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.

Nilamtai Gorhe
Shrikant Bhartiy; राज ठाकरे यांचे विधान हा मुंबईचा अपमान!

यावेळी दहा मिनीटे कामकाज तहकूब केल्यानंतर नरेंद्र दराडे यांनी कामकाज सुरु केले. मात्र तेव्हाही केवळ एक राज्यमंत्री होते. त्यानंतर धावतच गिरीष महाजन आले. मात्र एकनाथ खडसे यांनी अंतिम आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आम्ही मांडणी करीत राज्याचे प्रश्न मांडत आहोत. त्यासाठी शासनाचे महत्त्वाचे मंत्र्यांची उपस्थित असने आवश्यक आहे. सत्ताधारी पक्षाला त्याचे गांभिर्य वाटत नसल्याची टिका एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

Nilamtai Gorhe
APMC Politics: शिंदेंची शिवसेना बाजार समितीच्या रिंगणात?

श्री. महाजन आल्यानंतर देखील विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. यावेळी शिवसेनेचे अनिल परब म्हणाले, गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक असतील. मात्र ते सभागृहाबाहेर आहेत. सभागृहात नाही. ते आम्ही मान्य करणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संसदीय कार्यमंत्री हेच हजर राहिले पाहिजे, असा आग्रह धरले. त्यामुळे गोंधळ झाल्याने सभागृह तीस मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले.

Nilamtai Gorhe
Shashikant Shinde News: मुंबईचे लचके तोडण्याचे काम सुरु आहे!

पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर सभापती नीलमताई गो-हे यांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही खात्याचा मंत्री उपस्थित असला तरी चालते असे आपले संकेत आहेत. त्यामुळे संसदीय कामकाज मंत्र्यांच्या उपस्थितीचा आग्रह धरण योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com