मुंबई : मुंबईचे (Mumbai) अतिशय उत्तम सुशोभिकरण सुरु आहे. त्याची तुलना डान्स बार अशी करणे अयोग्य आहे. हा मुंबईचा अपमान आहे. असे विधान करताना किमान मुंबईचा इतिहास, संस्कृती याचा तरी विचार करायला हवा होता,अशी टिका भाजपचे (BJP) आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी केली आहे. (Mumbai will recive international guests on G20 event)
भाजप सदस्य प्रविण दरेकर यांनी नियम 260 अन्वये माडंलेल्या प्रस्तावावरील चर्चेत विविध सदस्यांनी भाग घेतला. त्याचे अनुमोदन श्री. भारतीय यांनी केले. यावेळी त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी काल केलेल्या विधानाचा समाचार घेतला.
ते म्हणाले, जी 20 परिषदेच्या निमित्ताने जगातील शिष्टमंडळ मुंबईला येत आहे. त्यांना आपण कशी मुंबई दाखवणार आहोत. त्याचा विचार करून मुंबई शहराचे सुशोभिकरण सुरु आहे. त्याची गरज आहे. मात्र त्याला राज ठाकरे यांनी डान्स बार असा शब्दप्रयोग केला. तो मुंबई शहराचा अपमान आहे.
ते म्हणाले, मुंबई शहराची एक संस्कृती आहे. इतिहास आहे. मुंबई शहरात अनेक नागरिक राहतात, त्यांच्या भावना आहेत. मुंबई शहरातील डबेवाले हे तर जगभर प्रसिध्द आहेत. त्यांच्या कामकाजा अभ्यास अनेक लोक करतात. या सगळ्यांना अभिमान वाटेल असे काम जी 20 परिषदेच्या निमित्ताने होत आहे. मात्र श्री. ठाकरे यांनी यासंदर्भात मला डान्स बार मध्ये बसल्यासारखे वाटते असे म्हटले, याचा खेद होतो.
यावेळी श्री. भारतीय यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्वाचा अवमान केला होता. 2014 ते 2019 या कालावधीत पाच वर्षे असलेल्या सरकारच्या कामकाजाच्या आधारे महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेने शिवसेना-भाजपला जनादेश दिला. तो कौल भाजप-शिवसेना सरकारला होता. मात्र हिंदुत्वाचे कैवारी, देशभर हिंदुत्वाचा राष्ट्रवादाचा विचार पसरवणारे (कै) बाळासाहेब ठाकरे यांचा तसेच राज्यातील साडे तेरा कोटी जनतेचा अपमान झाला. हिंदुत्वाचा विचार सोडून महाराष्ट्रात एक अनैसर्गिक सरकार सत्तेत आले. मात्र 2022 मध्ये जनतेच्या मनातील सरकार पुन्हा सत्तेत आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.