Jalgaon City Vidhan Sabha 2024 Result: जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे आघाडीवर ; हॅट्रिक मारणार?

Suresh Bhole leads Jalgaon City assembly constituency: भोळे यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जयश्री महाजन उभ्या आहेत. तर दुसरीकडे अश्विन सोनवणे व कुलभूषण पाटील हे दोघेही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
Jalgaon City Assembly Election 2024 result
Jalgaon City Assembly Election 2024 resultSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon City Assembly Election 2024 result: सहाव्या फेरीअखेर जळगाव शहर मतदारसंघात आमदार सुरेश भोळे यांना 53 हजार 703 मते मिळाली आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना19 हजार 488 मते मिळाली आहेत. भोळे 34 हजार 215 मतांनी आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार राजू भोळे हॅट्रिक मारणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Election Results 2024 LIVE Counting)

माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा बालेकिल्ला म्हणून जळगाव मतदारसंघाची ओळख आहे. पण 2014 साली सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर गेले दहा वर्ष जळगाव मतदारसंघ भोळे यांच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे. आपलं निर्विवाद वर्चस्व राखण्यात भोळे हे यशस्वी ठरले आहेत. (Vidhan Sabha election 2024 vote Counting live)

Jalgaon City Assembly Election 2024 result
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE Updates : निकालापूर्वीच भाजपला धक्का; आमदाराने केली मोठी घोषणा

भोळे यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जयश्री महाजन उभ्या आहेत. तर दुसरीकडे अश्विन सोनवणे व कुलभूषण पाटील हे दोघेही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भोळे यापूर्वी दुसऱ्या वेळी या मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्याआधी, या मतदारसंघावर सुरेश जैन यांचा दबदबा होता.

सुरेश जैन यांनी या मतदारसंघातून सात वेळा निवडणूक जिंकली आहे, ज्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवली. काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमधून त्यांनी दोन वेळा निवडणूक जिंकली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सुरेश दामू भोळे दुसऱ्या वेळेस भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत उभे राहिले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) ने अभिषेक पाटील यांना या मतदारसंघातून तिकिट दिले होते.

या निवडणुकीत भाजपचे सुरेश भोळे आणि राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांच्यात मुख्य लढत होती. अभिषेक पाटील यांनी भाजपच्या विरोधात कडवी लढत दिली, मात्र सुरेश दामू भोळे यांच्या लोकप्रियतेवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. सुरेश भोळे यांनी अभिषेक पाटलांना ६४,८४६ मतांनी मोठ्या फरकाने पराभूत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com