Congress Vs BJP: विकासाला स्थगितीचे पाप करणाऱ्यांना लागेल शाप!

Maharashtra Politics, Congress leader criticized BJP Government-काँग्रेस नेते ॲड. के. सी. पाडवी मतदारसंघातील कामांना स्थगिती देणाऱ्या भाजपवर चांगलेच घसरले
Congress Leader K. C. Padvi
Congress Leader K. C. PadviSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर भाजपच्या सरकारने विरोधी पक्षाच्या विकासकामांना स्थगिती दिली होती. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस नेते अॅड. के. सी. पाडवी भारतीय जनता पक्षावर चांगलेच घसरले. (Devolopment Works in K. C. Padvi`s Constituency in Nandurbar District)

अक्कलकुवा (नंदूरबार) (Nandurbar) मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन काँग्रेस (Congress) नेते, आमदार अॅड. पाडवी यांनी केले. या वेळी त्यांनी विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकारने केले. त्यामुळे विरोधकांना नव्हे तर जनतेवर अन्याय झाल्याचे सांगितले.

Congress Leader K. C. Padvi
BJP Jalgaon Politics: रक्षा खडसेंनी दिला केळी उत्पादकांना दिलासा!

राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या काळात मंजुरी मिळालेल्या कामांना स्थगिती दिली होती. हा निर्णय भाजपच्या विरोधकांची कोंडी करण्यासाठी घेतलेला राजकीय निर्णय होता. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे न्यायालयात राज्य सरकारचा हा निर्णय टिकला नाही. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिलासा मिळाला होता.

या पार्श्वभूमीवर पाडवी यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. या वेळी ते म्हणाले, जनतेच्या हितासाठी मंजूर विकासकामांत विरोधकांचेही सहकार्य आवश्यक असते; परंतु राज्यात सत्ताबदलानंतर आघाडीने मंजूर केलेल्या विकासकामांवर सरकारने स्थगिती आणली. या स्थगितीचे पाप विकासातील शाप ठरत होते. हे पाप करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा.

स्थगिती उठविल्यानंतर धडगावपाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील विकासकामांचेही भूमिपूजन ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त पिंपळखुटा (ता. अक्कलकुवा) येथे काँग्रेसची सभा घेण्यात आली. या वेळी पाडवी यांनी स्थगितीच्या निर्णयावर भाजप सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली.

काँग्रेस स्वातंत्र्य देणारा पक्ष

पाडवी म्हणाले, काँग्रेसने जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, तसे प्रत्येक क्षेत्रात जनतेला स्वातंत्र्य देणारे म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. काही पक्षांनी व्यक्तिस्वातंत्र्यासह लोकशाही व अन्य घटकांतून जनतेला धोका निर्माण केला आहे.

Congress Leader K. C. Padvi
Winter Session Nagpur : ...खोके सरकार 420 !' संत्र्यांच्या माळा गळ्यात घालत विरोधकांचे आगळे- वेगळे आंदोलन, पाहा फोटो!

या वेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रतन पाडवी, ॲड. गोवाल पाडवी, सीताराम राऊत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सी. के. पाडवी, निर्मला राऊत, जान्या पाडवी, सभापती नानसिंग वळवी, विक्रम पाडवी, उपसभापती मेलदीबाई वळवी, माजी सभापती बिज्या वसावे यांसह विविध नेते उपस्थित होते.

Congress Leader K. C. Padvi
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा समन्वयावर भर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com