जळगाव जिल्हा बॅंक : आघाडीचे जागावाटप निश्चित.. काॅंग्रेसची एका जागेवरून कुरबूर

जळगाव जिल्हा बॅंकेच्या (Jalgaon District Bank) निवडणुकीत तीनही पक्ष एकाच पॅनेलमध्ये
Jalgaon District Bank
Jalgaon District BankSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ जागा लढणार आहेत.तरीही महिला राखीव मधून एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. त्याबाबत वाद होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँक संचालक निवडणुकीत महा विकासआघाडीच्या जागा वाटपासाठी आज शासकीय विश्राम गृहात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जागा वाटपावर चर्चा. करण्यात आली. चोपडा येथील जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली. त्यामुळे सद्या तरी हा वाद मिटला आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ जागा देण्यात आल्या आहेत,तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला तीन जागा देण्यात आल्या आहेत.

Jalgaon District Bank
काँग्रेसचा चोपडाच्या जागेवरून राष्ट्रवादीला इशारा : अरुण गुजराथी, एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला!

काँग्रेसची चार जागेची मागणी

काँगेस पक्षालला तीन जागा देण्यात आल्या आसल्या तरी त्यांनी आणखी एका जागेची मागणी केली आहे. महिला राखीव मधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर येथील तिलोतमा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी अडून आहेत. त्यामुळे या जागेचा वाद कायम आहे.

Jalgaon District Bank
अखेर एकनाथ खडसे बिनविरोध; विरोधकांना धक्का

काँगेसला सद्या यावल,रावेर व चोपडा या तीन विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव या विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत,तर शिवसेनाला जळगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा,या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत. तर सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी, इतर संस्था व महिला राखीव या जागा देण्यात आल्या आहेत. एसटी आणि व्हीजेएननटीची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे.

या बैठकीत शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी तर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेस तर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com