अखेर एकनाथ खडसे बिनविरोध; विरोधकांना धक्का

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्जही बाद झाला आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे नाना पाटील यांचे अपील फेटाळून लावण्यात आले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा निर्णय नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी दिल्याने खडसे यांचा जिल्हा बँक संचालक पदाचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्हा बँक (Jalgaon district Bank) संचालक पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी भुसावळ येथील एका पतपेढी चे कर्ज घेवून ते थकवले असल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला.

Eknath Khadse
मुख्याध्यापकाचे अमानवी कृत्य : पाणीपुरी खायला गेला म्हणून दुसरीतील मुलाला उलटं टांगलं

या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्या कडे अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनीही त्यांचे अपील फेटाळले. त्यामुळे पाटील यांचा अर्ज बाद झाला आहे. परिणामी, एकनाथ खडसे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अर्ज बाद झालेल्या भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह आठ उमेदवारांचे अपील फेटाळण्यात आले आहे.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील महेंद्र सपकाळे यांचे अपील मंजूर करून त्यांचा अर्ज कायम ठेवण्यात आला आहे. मात्र अर्ज बाद केलेले उमेदवार औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, खडसे यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा उमेदवारी अर्जही बाद झाला आहे. त्यांनी महिला राखीव व इतर मागासवर्ग या दोन गटात अर्ज दाखल केला होता. पण दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले आहेत.

Eknath Khadse
अखेर मलिकांकडून पिक्चरच्या 'दि एंड'ची घोषणा

स्मिता वाघ यांचा अमळनेर विकास सोसायटीतील अर्ज बाद झाला आहे. तर महिला गटातून त्यांचा अर्ज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील बिनविरोध निवडून येणार आहे. निवडणुकीत संचालकांच्या 21 जागांसाठी एकूण 279 अर्ज आले होते. ही निवडणूक 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com