APMC election : निकालांतून महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला!

बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्वच प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी सुचक इशारा दिला आहे.
Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan BhujbalSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

Nashik APMC analysis : बाजार समितीच्या निवडणुका आगामी विधानसभेची रंगीत तालीम मानली गेली. बहुतांशी दिग्गज नेते या मैदानात त्वेषाने उतरलेले दिसले. काहीही करून सत्ता राखा किंवा प्रतिस्पर्ध्याला हरवा यातून लक्ष्मी दर्शनाचा उजेड पडला. एवढा जोश असण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वर्षांनी मोठ्या स्तरावरील व्यापक निवडणुका झाल्या. त्यात मतदारांनी प्रस्थापितांच्या बाजुने कौल देतानाच सत्ताधाऱ्यांना मात्र आस्मान दाखवल. (APMC election was a trial for assembly elections)

कार्यकर्ते जिल्हा परिषद, (ZP) पंचायत समिती, महापालिका (NMC) निवडणुकांची प्रतिक्षा करीत होते. राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांना (APMC election) मुहूर्त लागला. त्यामुळे जमवलेली सगळी शक्ती नेते, कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत लावली. त्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राज्यातील सत्ताधारी भाजप, (BJP) शिंदे गटावर (Eknath Shinde) कुरघोडी केली आहे.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका सोडल्या तर अन्य निवडणुका झालेल्या नाहीत. शिंदे सरकारनं बाजार समित्यांच्या निवडणुका घेतल्या आणि राजकीय क्षेत्रात अमाप उत्साह निर्माण झाला. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वतःला या निवडणुकीत झोकून दिलं. महाविकास आघाडीचं यश उल्लेखनीय ठरलेलं असताना भाजप आणि शिंदे गट सावध होऊन आता आगामी निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखेल, असे संकेत या निवडणुकीनं दिले आहेत.

बाजार समित्यांच्या निवडणुकांना राजकीय महत्त्व आहे. बाजार समित्यांमधील प्रतिनिधी हे तालुक्यातील प्रतिनिधी असतात. तसेच मतदारसंघाचेही ते नेते मानले जातात. प्रत्येक ग्रामपंचायतीतील सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यातील संचालक या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे या निवडणुकीतून नेत्यांची पत समजते, म्हणूनच बाजार समित्यांच्या निवडणुकांना विधानसभेची रंगीत तालीम म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांना ज्यांना धडा शिकवायचा आहे आणि ज्यांना धडा घ्यायचा आहे, असे सगळे या निवडणुकीत पूर्ण क्षमतेनं उतरतात. यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी बऱ्यापैकी एकत्र लढली. काही ठिकाणी समजुतीनं एकमेकांविरुद्ध लढण्याचे मनसुबे प्रत्यक्षात उतरवले, असं म्हणण्यास देखील वाव आहे. यावर भाजप-शिंदे गटाला सखोल संशोधन आता करावं लागेल.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Pimpalgaon APMC : दिलीप बनकर यांचा गड अभेद्य, ११ जागा जिंकल्या!

लासलगाव, सिन्नर, येवला येथे महाविकास आघाडी एकत्र रिंगणात नव्हती. ही मंडळी जाणीवपूर्वक समोरासमोर लढले का, हे तपासून पाहावं लागेल. किंबहुना आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा मुद्दा किती कळीचा ठरणार आहे, हे या ठिकाणांवरून दिसून आलं. भाजप-शिंदे गट हेदेखील पर्याय अडचणीच्या जागांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता भविष्यात नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, लासलगावला भाजप-राष्ट्रवादी सोबत दिसून आले. देवळ्यात तर सर्वपक्षीय एकत्र आले. मालेगावमधील पराभव मंत्री दादा भुसे यांच्या जिव्हारी लागणारा आहे. पिंपळगावला दिलीप बनकर अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. अनिल कदम ईर्षेने लढले, पण रसायन काही जमलं नाही.

लासलगाव बाजार समितीत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली. पंढरीनाथ थोरे यांनी ऐनवेळी भाजपशी संधान साधत वेगळी चूल मांडली. भुजबळांनी राष्ट्रवादीतील एकी राखण्याचा इथे केलेला प्रयत्न निष्फळ का ठरला हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. एका जागेसाठी भाजपची सत्ता आली अन् एक जागेअभावी राष्ट्रवादीची गेली. डावपेच कमी पडली की इगो, यावर आता बराच काळ चर्चा होत राहील.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

बाजार समितीतील निवडणूक किती काट्याची असते, हे आकड्यांवरून स्पष्ट होते. पिंपळगावला भास्करराव बनकर तीन मतांनी पडले. तर नाशिकला दिलीप थेटे एका मताने पराभूत झाले.

सिन्नरला कोकाटे गटाचे दोघे अनुक्रमे तीन आणि सतरा मतांनी, तर वाजे गटाचे दोघे २१ आणि २२ मतांनी पराभूत झाले. यावरून स्पर्धात्मकता अधोरेखित होते. तसं पाहिलं तर नाशिक, मालेगाव, पिंपळगाव आणि लासलगाव वगळता अन्य बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. अन्य ठिकाणी या निवडणुका प्रतिकात्मक नेतेगिरीसाठी लढल्या जातात.

नाशिक बाजार समितीत देवीदास पिंगळे यांनी शिवाजी चुंभळे यांचा पराभव केला. मात्र दोघांचा पूर्वापार चालत आलेला संघर्ष पुढेही सुरू राहण्याचीच चिन्हे आहेत. एक मात्र नक्की, यंदाच्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत पैसा पाण्यासारखा वाहिला. एखाद्या सुजाण मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत नेत्याने या सगळ्या राजकीय आखाड्यात न उतरलेलंच बरं.. केवळ पैशाचं तत्त्वज्ञान इथं चालतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com