Pimpalgaon APMC : दिलीप बनकर यांचा गड अभेद्य, ११ जागा जिंकल्या!

दिलीप बनकर यांना ११ तर माजी आमदार अनिल कदम यांना ६ जागा मिळाल्या.
Dilip Bankar
Dilip BankarSarkarnama

Deelip Bankar wins : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पिंपळगांव बाजार समितीवरील २३ वर्षांपासूनची सत्ता राखण्यात आमदार दिलीप बनकर यशस्वी झाले. या निवडणुकीत बनकर यांच्या पॅनलला ११ तर विरोधातील शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनलला ६ जागा मिळाल्या. यतीन कदम हे अपक्ष उमेदवार विजयी झाले. (NCP MLA Deelip Bankar kept his castle intact in APMC election)

ही निवडणूक (APMC election) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार अनिल कदम या पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांतच रंगली. त्यात अनिल कदम यांनी सुरवातीपासून चुरस निर्माण केली होती. मात्र बनकर २३ वर्षांची आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरले.

Dilip Bankar
Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे विजयी उमेदवार असे, आमदार बनकर (५५३), दीपक बोरस्ते (४४८), रामभाऊ माळोदे (४४१), ज्ञानेश्वर शिरसाठ (४७४), मनिषा खालकर (४५५), जगन्नाथ कुटे (४८२), शिरीष बापू गडाख (२३१), महेंद्र गांगुर्डे (३१५), सोहनला भंडारी (४२९), शंकरलाल ठक्कर (३८२), नारायण पोटे (२११).

शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सहा जागा मिळाल्या. त्यात अनिल कदम (४७७), गोकुळ गिते (४७३), डॉ. प्रल्हाद डेर्ले (४२५), अमृता पवार (५१९), दिलीप मोरे (४९०), राजेश पाटील (३१९) यांचा समावेष आहे. भाजपचे यतीन कदम (२८८) हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.

Dilip Bankar
Lasalgaon APMC Result : मतदारसंघातील समितीत छगन भुजबळ यांचा पराभव!

अमृता पवार यांचा प्रवेश

या निवडणुकीला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीतील राजकारणाचा कंगोरा आहे. आमदरा बनकर यांच्या कुटुंबियांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत निफाडचे असुनही प्रगती पॅनेल विरोधातातील पॅनलच्या व्यासपीठावर गेले होते. त्याचा अनेकांना राग होता. यातूनच लोकांनी आग्रह केल्याने अमृता पवार यांनी बनकर यांच्या विरोधातील पॅनलमध्ये उमेदवारी केली. त्या लक्षणीय ५१९ मते घेऊन विजयी झाल्या. या पॅनेलचे दिलीप मोरे देखील विजयी झाले.

जावई वाऱ्यावर....

आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनेलमध्ये सुभाष होळकर हे बनकरांचे जावई उमेदवार होते. श्री. होळकर यांनी मजुर फेडरेशनच्या गेल्या निवडणुकीत बनकर यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. त्याची झळ बनकर यांच्या उमेदवारांना बसली होती. त्यामुळे कदाचीत यंदा त्यांना पॅनलमध्ये उमेदवारी दिली असावी. मात्र या जावयाला वाऱ्यावर सोडले असावे असे बोलले जाते. कारण त्यांना अवघी १७५ मते मिळाली. त्यामुळे हे जावई चर्चेत होते.

आमदार बनकर यांची सत्ता उलथविण्यासाठी दिग्गज नेत्यांची मोट बांधुन माजी आमदार कदम यांनी प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले नाही. पिंपळगांवचे सरपंच भास्करराव बनकर हे अवघ्या तीन मतांनी पराभुत झाले. पिंपळगांव बाजार समितीची सत्ता राखुन आगामी विधानसभेच्या लिटमस टेस्ट मध्ये आमदार बनकर हे काही अंशी यशस्वी झाले. मतमोजणी दरम्यान माजी आमदार अनिल कदम व भाजपाचे यतीन कदम हे चुलत बंधु परस्परांमध्ये भिडल्याने जोरदार राडा झाला.

राज्याचे लक्ष वेधलेल्या पिंपळगांव बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणारा ठरला.सोसायटी व ग्रामपंचायत गटातील लढती तर अत्यंत कमी फरकाचे एक-दोन अंकी झाल्या.आमदार दिलीप बनकर यांचा ५० मतांच्या फरकाने विजयी झाले. आमदार बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलला होमपिच असलेल्या पिंपळगांव बसवंत परिसरात जोरदार दणका बसुन उमेदवार पिछाडीवर जात असतांनाच गोदाकाठच्या मतदारांनी आमदार बनकर यांच्या पॅनलवर विश्‍वास दाखविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com