Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

मालेगाव बाजार समितीच्या जाहीर झालेल्या अकरा पैकी दहा जागा हिरे गटाकडे.
Dada Bhuse & Adway Hire
Dada Bhuse & Adway HireSarkarnama

Malegao APMC Result : राज्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या पहिल्या अकरा जागांपैकी दहा जागा जिंकून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर मात केली. शिंदे गटाला हा जबर धक्का मानला जातो. भुसे यांची १५ वर्षे या समितीत सत्ता होती. हिरे यांच्या विजयामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. (Shivsena`s Adway Hire defeated Guardian Minister Dada Bhuse in APMC election)

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यादृष्टीने त्यांनी विविध डावपेचांचा वापर करीत हिरे यांच्यावर दडपण आणले होते. शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे भुसे विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे उपनेते हिरे यांच्यात ही सरळ लढत होती. त्यात १८ जागापैकी अकरा निकाल जाहीर झाले. त्यातील दहा जागा हिरे गटाने जिंकल्याने भुसे यांचा पराभव अटळ आहे.

Dada Bhuse & Adway Hire
Dindori APMC : झिरवळांच्या मतदारसंघात झाला युवा नेतृत्वाचा उदय!

जाहीर झालेल्या अकरा जागांचे निकाल असे, सोसायटी गटात (सर्वसाधारण) डॉ. अद्वय प्रशांत हिरे, सुभाष भिला सुर्यवंशी, रविंद्र गोरख मोरे, विनोद गुलाबराव चव्हाण, संदिप अशोक पवार, राजेंद्र तुकाराम पवार, उज्जैन निंबा इंगळे, एन.टी. गटात नंदलाल दशरथ शिरोळे, महिला राखीव गटात मिनाक्षी अनिल देवरे, भारती विनोद बोरसे हे सर्व दहा विजयी उमेदवार अद्वय हिरे पॅनेलचे आहेत. पालकमंत्री भुसे यांच्या आपलं पॅनेलचे सोसायटी विभागात इतर मागास वर्ग गटातील चंद्रकांत धर्मा शेवाळे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहे.

Dada Bhuse & Adway Hire
Sinnar APMC election : आमदार कोकाटेंच्या सत्तेला धक्का; वाजे, कोकाटेंना समान जागा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते, पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते या पारंपारीक विरोधकांत बाजार समितीच्या निवडणुकीची लढाई अगदी टोकाला गेली आहे. नुकतेच हिरे यांच्या आप्तस्वकीयांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत सुडाचे राजकारण रंगल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय होता. या निकालाचा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भुसे विरोधकांना उत्साहवर्धक ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com