एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’ लढणार

दूध संघ निवडणुकीत १९ जागांसाठी ४१ उमेदवार शिल्लक राहिले.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (Election) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’चे (Mahavikas Aghadi) पॅनल करण्याचे निश्‍चित झाले आहे. पॅनलची एक जागा बिनविरोध झाली आहे. १९ जागांसाठी ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. लवकरच उमेदवारांची नावे निश्‍चित करण्याचे मंगळवारी झालेल्या पॅनलच्या बैठकीत ठरविण्यात आले. (Eknath Khadse will lead Jalgaon district milk federation election)

Eknath Khadse
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या येथील निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली झाली. राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, प्रदीप देशमुख, शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उपस्थित होते.

एकनाथ खडसे यांनी सांगितले, की जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आम्ही ‘महाविकास आघाडी’ पॅनल तयार केले आहे. याच माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहेत. आमची रावेर येथील एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित १९ जागांसाठी ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आम्ही त्यातून १९ उमेदवार निश्‍चित करून उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत.

विरोधकांकडून गलिच्छ राजकारण

एकनाथ खडसे म्हणाले, की विरोधकांकडून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही अत्यंत खालच्या दर्जाचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप ते करीत आहेत. मात्र, गेल्या सात वर्षांत जिल्हा दूध संघात आपण जे काम केले आहे. त्याबाबत जनता आमच्या पाठीशी आहे. आपण संघाच्या मतदारांशी संपर्क साधला आहे. ते विरोधकांच्या गलिच्छ राजकारणाविरोधात आहे. जिल्हा दूध संघात अपहार ते सांगत आहे, ती मुळात चोरी आहे आणि हे आमच्या संचालकांच्या काळात घडलेले नाही, तर प्रशासकीय काळात घडले आहे. मात्र, पोलिसांवर दबाव आणून त्यांना कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. जनता विरोधकांना निवडणुकीत निश्‍चित उत्तर देईल.

मी महाविकास आघाडीतच : डॉ. सतीश पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले, की आपण महाविकास आघाडीच्या पॅनलमध्येच आहोत. पॅनलप्रमुख खडसे यांच्यामार्फतच सर्व निर्णय घेतले जातील. आपणास विरोधकांच्या पॅनलचे आमत्रंण आले होते. मात्र, भाजप म्हणून पॅनलला नकार दिला. सर्वपक्षीय पॅनल होत असेल, तर आपण तयारी दर्शविली होती. मात्र, त्यांनी श्री. खडसे यांना वगळून पॅनल तयार होईल, असे सांगितले. त्याला आपण विरोध केला. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे आपण महाविकास आघाडीमार्फतच लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com