South Solapur Assembly : दक्षिण सोलापूरसाठी माने, हसापुरे, मिस्त्री इच्छूक; सुशीलकुमार शिंदे कोणाला तिकिट देणार?

Assembly Election 2024 : दिलीप माने यांची दावेदारी मोठी आहे. कारण, या मतदारसंघातून माने यांनी यापूर्वी एकदा निवडणूक जिंकली असून आता पुन्हा ते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
Congress Leader
Congress LeaderSarkarnama

Solapur, 17 June : प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सोलापुरातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्याच वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसकडे विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून (South Solapur Assembly) माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे (suresh Hasapure), मागील विधानसभा निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री (Baba Mistri), याशिवाय तालुक्यातील इतरही काही नेते आमदारकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे नेमके कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे माप टाकणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून 9436 चे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना एक लाख पाच हजार 474 मते मिळाले आहेत, तर विरोधातील राम सातपुते यांना 96 हजार 38 मते मिळाली आहेत, त्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या आशा वाढलेल्या आहेत.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री हे इच्छुक आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावासाठी हसापुरे यांच्या भावाने काँग्रेसश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता.

लोकसभा निवडणुकीत धवलसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला होता, त्यामुळे धवलसिंह यांचे नाव आपोआपच रद्द झाले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेले दिलीप माने यांची दावेदारी मोठी आहे. कारण, या मतदारसंघातून माने यांनी यापूर्वी एकदा निवडणूक जिंकली असून आता पुन्हा ते एकदा काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

Congress Leader
Cabinet Expansion : सोलापूरमधून मंत्रिपदाची संधी कोणाला...देशमुख, कल्याणशेट्टी की बबनदादा?

सुरेश हसापुरे यांनी गेली वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीची तयारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हसापुरे सहजासहजी माघार घेणार का आणि दिलीप माने यांना संधी मिळणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांना ‘टप फाईट’ देणारे सोलापूरचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनीही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी दंड थोपटले आहेत, त्यांनीही मतदारसंघात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे कोणाला विधानसभेची उमेदवारी देणार आणि कोणाला दुखावणार, हा खरा प्रश्न आहे. कारण, हसापुरे आणि मिस्त्री हे पक्षाच्या प्रतिकूल काळात काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहेत. दिलीप माने यांनी मात्र काँग्रेसमधून शिवसेनेत उडी मारत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे दक्षिण सोलापूरची उमेदवारी सुशीलकुमार शिंदे कोणाला देणार, यावरच दक्षिणमधील लढत कशी असणार, हे निश्चित होणार आहे.

Congress Leader
Sandeep Kshirsagar : ‘जयदत्त क्षीरसागर सध्या ‘राजकीय फ्रेम’मध्येच नाहीत, त्यामुळे बीडमध्ये मला कोणीही प्रतिस्पर्धी नाही’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com