
Maharashtra politics : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटीली सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारने 296 कोटींची मदत केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे आणि थोरात या दिग्गज नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांच्या निवडणुका आहेत. याचमुळे राज्य सरकारने मंत्री विखे यांच्या अधिपत्याखालील कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (NCDC) माध्यमातून मार्जिन मनी लोन दिले आहे. यावर मंत्री विखे यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री विखे म्हणाले, "विखे कारखान्यालाच नाही, तर राज्यातील अनेक कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मार्जिन मनी लोन देत मदत करण्यात आली आहे. सहकारी साखर कारखान्यांना मदत व्हावी, यासाठी NCDC हे पैसे देते. राज्य सरकारचं नियंत्रण असावं म्हणून त्यांच्या माध्यमातून ही मदत दिली जाते". शेतकऱ्यांच्या (Farmer) मालकीचे साखर कारखाने सुस्थितीत चालावेत आणि त्यांचे खासगीकरण होऊ नये यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांच्या अधिपत्याखालील आपापल्या क्षेत्रात सहकारी कारखाने आहेत. या दोन्ही नेत्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सहकारी कारखाना आहे. थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये सहकारी महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि मंत्री विखेंच्या अधिपत्याखाली प्रवरा नगरचा पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आहे.
या दोन्ही कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका लवकरच होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची देखील नियु्क्ती झाली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कधीही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होईल. विखे यांच्या अधिपत्याखालील राहाता इथल्या गणेश सहकारी साखर कारखान्यात थोरात-कोल्हे युतीने परिवर्तन घडवून आणले. या गणेश कारखान्याला देखील राज्य सरकारकडून मदत मिळाली आहे.
मंत्री विखे यांच्या कारखान्याला देखील मदत मिळाली आहे. पण काही अटी घातल्या आहेत. कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत कारखान्याच्या संचालक मंडळाला पगार, मानधन किंवा इतर कोणतेही भत्ते, इतर फायदे देऊ नये. तसेच संचालकांना भागभांडवलावर लाभांशही न देण्याचा आदेश देण्यात आला आहे. आता विखे कारखान्याला 296 कोटींचे मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यासंदर्भातील आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.