malegaon mahanagarpalika
malegaon mahanagarpalikaSarkarnama

Asif Shaikh Politics: मालेगाव महापालिकेत "इस्लाम" पक्षाचा उदय; भाजपच्या पथ्यावर?

BJP strategy in Malegaon politics : मालेगावमध्ये राजकीय सभा घेताना आसिफ शेख; ‘इस्लाम’ पक्षाच्या उदयानंतर भाजपला अप्रत्यक्ष फायदा होतोय का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा.
Published on

Congress Vs BJP News: मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांची एन्ट्री झाली आहे. या एन्ट्री मागे भाजपच्या धोरणात्मक राजकारणाचा वाटा आहे. आसिफ शेख यांच्या पक्षाचे राजकारण भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा राज्यभर झंझावात दिसून आला. मात्र कोणत्या महापालिकेत भाजपला यश मिळणार नाही?. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप आधीच मालेगाव शहराचा उल्लेख केला होता.

या शहरात भाजपला कधीही स्थान मिळालेले नाही. त्याचा देखील राजकीय लाभ भाजपने उठवला आहे. यासाठी किरीट सोमय्या हा फॅक्टर अचूकपणे वापरण्यात आला. गेले काही महिने माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने मालेगावला येत होते. शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात असा आरोप करून जात होते. वास्तवात येथे एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही. मात्र सोमय्या यांचा गाजावाजा थांबला नव्हता.

malegaon mahanagarpalika
Chhagan Bhujbal Politics : छगन भुजबळांची अनुपस्थिती; नेतृत्वहीन अजित पवारांची राष्ट्रवादी ठरली प्रभावहीन!

यानिमित्ताने बोगस आधार कार्ड आणि कागदपत्रांचा मुद्दा गाजला. विशेष पोलीस महानिरीक्षकांची एसआयटी तपासणीसाठी नियुक्त करण्यात आली. तहसीलदारांसह महापालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. भाजपच्या या राजकारणाला एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती फारसा विरोध करू शकले नाही. मात्र राजकीय संधी ओळखून माजी आमदार असिफ शेख यांनी त्यावर जोरदार आंदोलन केले. गावच्या नागरिकांना मागे ते खंबीरपणे उभे राहिले. आता त्याने भाजप विरोधात बोलत राहिले.

त्यातूनच त्यांनी इस्लाम हा पक्ष स्थापन केला. या पक्षाला महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 35 जागा मिळाल्या आहेत. सत्तेसाठी त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. हा पक्ष अस्तित्वात आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम या पक्षाच्या विरोधात त्यांना भूमिका घ्यावी लागेल. यातील कोणत्याही एका पक्षाने लोकसभेला उमेदवार दिल्यास भाजपचा लाभ होणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना मालेगाव शहरातून दोन लाख आठ हजार रुपये की एक लाख 98 हजार मते मिळाली होती. त्या अवघ्या 3000 मतांनी विजयी झाल्या होत्या. हेच कॅल्क्युलेशन विचारात घेऊन मालेगाव शहरातील एम आय एम आणि इस्लाम या दोन पक्षांमध्ये जास्तीत जास्त वाद कसा पेटेल असा प्रयत्न भाजपचा राजकीय अजेंडा आहे.

malegaon mahanagarpalika
Nashik MNS : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन फक्त एका जागेवर पडले बंद

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील संख्याबळ आणि घडामोडी हा काँग्रेस पक्षासाठी धोक्याचा इशारा आहे. किंचितशी मत विभागणी ही काँग्रेसला हानिकारक ठरणार आहे. आधीच पक्षाचे धुळे आणि मालेगाव मधील अनेक नेते भाजप वासी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगावच्या गल्लीतील राजकारणाने भाजपला दिल्लीतील संधी दिसत आहे. त्यामुळे भाजपला महापालिका निवडणुकीत संधी नसली तरी भविष्यात दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी दिसू लागली आहे. त्यामुळे हे राजकारण भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com