NCP Ajit Pawar News : नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी युती केली होती. मात्र ही युती या पक्षाला तारू शकली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला प्रभाव दाखवता आला नाही. नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. या पक्षाने बेचाळीस जागा लढवल्या होत्या. त्या तुलनेत पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नाही.
महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हात मिळवणे करण्याचा प्रयत्न केला. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटच्या टप्प्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने अपरिहार्य स्थितीत राष्ट्रवादीशी युती केली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. मात्र त्यांच्यात कुठेही समन्वय दिसून आला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी सभा घेतली. उमेदवारांना विविध प्रकारे पाठबळ दिले. तशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नव्हती.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे अनुपस्थिती महापालिका निवडणुकीत विशेषत्वाने जाणवली. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद निवडणुकीच्या दरम्यान गेले. मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी ही निवडणूक लढवली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महापालिका निवडणुकीची जबाबदारी छगन भुजबळ यांनी घ्यावी असे विधान केले होते. मात्र प्रकृती अस्वस्थ त्यामुळे मंत्री भुजबळ नाशिकला नव्हते. आक्रमक चेहरा असलेले भुजबळ या निवडणुकीत नसल्याने त्याचा फटका या पक्षाला बसला.
डॉ हेमलता पाटील, सीमा ठाकरे आणि जागृती गांगुर्डे या तीन नगरसेविका निवडून आल्या. उर्वरित सर्व 39 उमेदवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले कैलास मुदलियार आणि कविता कर्डक यांनी शिवसेना शिंदे पक्षाची वाट धरली. यामध्ये कैलास मुदलियार प्रभाग वीस मधून विजयी झाले.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांसह सात जणांची समन्वय समिती नियुक्त केली होती. मात्र या समितीच्या समांतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपली यंत्रणा राबवली. त्यामुळे या समितीतील नेत्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेकडे पूर्णतः पाठ फिरवली. नेत्यांमधील हा बेलपणाव पक्षाच्या मार्गात अडचण ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.